राष्ट्राध्यक्षांबरोबर सुरू असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तो झाला ‘न्यूड’ आणि…

ब्राझीलमध्ये झूम अॅपवर राष्ट्राध्यक्षांची बैठकी सुरू होती.

brazil..

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी भारतासह अनेक देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सगळेच सध्या वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालये असोत किंवा खासगी कंपन्यां, सगळेच महत्त्वपुर्ण बैठकीसाठी झूम अ‍ॅपचा वापर करत आहेत. झूम अ‍ॅपचा वापर करत अनेक कंपन्यांमध्ये दररोजच्या मिटींग पार पडत आहेत. परंतु या अ‍ॅपच्या माध्यमातून ब्राझीलमध्ये राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या भेटी दरम्यान एका अधिकाऱ्याला लाजीरवाण्या परिस्थितीचा सामना करावा लागला.

ब्राझीलमध्ये झूम अॅपवर राष्ट्राध्यक्षांची बैठकी सुरू होती. यादरम्यान एक अधिकारी व्हिडिओ बंद करण्यास विसरला आणि कॅमेरासमोर नग्न झाला आणि तेव्हा त्याला लाजीरवाण्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं. कारण त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्स सुरू होती. ज्यावेळी तो अधिकारी नग्न अवस्थेत कॅमेरासमोर आला त्यावेळी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैयर बोलसनोरो लॉकडाऊनच्या परिणामांबद्दल इतर १० जणांशी बोलत होते.

काही सेकंदानंतर, उद्योग खात्याचे मुख्य अधिकारी, पाउलो गेडिस यांना व्हिडिओमध्ये काय चालले आहे याची जाणीव झाली. त्याच्या लक्षात आले की थेट व्हिडिओ दरम्यान, मीटिंगमध्ये उपस्थित असलेला एक अधिकारी शॉवरमध्ये नग्न स्नान करीत होता. बैठकीनंतर या व्हिडिओ कॉन्फरन्सला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्या अधिकाऱ्याचे नाव समजले नाहीये. या आधी ब्राझीलमध्ये ऑनलाईन सुरू असलेल्या कोर्टात एक सुनावणी दरम्यान जज शर्टलेस दिसले होते.


हे ही वाचा – खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी प्रेक्षकांच्या जागी ‘सेक्स डॉल्स’