घरट्रेंडिंगVideo: दारुसाठी कायपण.. 'या' पठ्ठ्याचा जुगाड पाहून तुम्ही व्हाल थक्क!

Video: दारुसाठी कायपण.. ‘या’ पठ्ठ्याचा जुगाड पाहून तुम्ही व्हाल थक्क!

Subscribe

भारतीय लोक जुगाड करण्यात सर्वात पुढे आहेत. आपल्याकडील जुगाडच्या घटनेला कशाचीही तोड नाही. मग ती शेतातील कीटना पळून लावल्याचा जुगाड असो किंवा सोशल डिस्टन्स्टिंगचे पालन करण्याचा जुगाड असो. आपल्याकडे अनेक आश्चर्यचकीत करणारे जुगाडाच्या घटना घडल्या आहेत. आता पण अशाच प्रकारची घटना गुजरातमध्ये घडली आहे. चक्क बाइकच्या टाकीमध्ये दारू तस्करीचा जुगाड केला आहे. या घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

कोणालाही न कळता बाइकमधून किती वाइनच्या बाटल्या नेल्या जाऊ शकतात? याचे उत्तर १ किंवा २ असेल. पण या पठ्ठ्याने एका बाइकमधून २० दारूच्या बाटल्या लपवल्या. यासंदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो गुजरात मधील आहे. जेथे दारू बंदी लागू केली आहे. या व्हायरल व्हिडिओमधील बाइकवाल्या पठ्ठ्याने जवळपास १५ ते २० बाटल्या बाइकमध्ये लपवल्या आहेत.

- Advertisement -

दारू बंदी असल्यामुळे लोकांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बाइकच्या टाकीत दारुच्या बाटल्या लपवल्या आहेत. पण या जुगाड पोलिसांमुळे उघडकीस आला आहे. अक्षरशः या बाइकच्या टाकीत दारुच्या बाटल्या ढीग पोलिसांनी काढला. या बाइकवाल्या पठ्ठ्याने टाकीत दारू लपवण्यासाठी पेट्रोल सिस्टम काढून ते सीटच्या खाली बसवले. यानंतर या रिकाम्या टाकीत दारुच्या बाटल्या भरल्या. पण याला हा जुगाड महागात पडला असून बाइकवाल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जुळ्या बहिणींचे, जुळ्या भावांशी लग्न, आता एकत्र होणार आई!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -