घरदेश-विदेशकुत्र्याला मारण्याच्या रागावरून माणसाने माणसाचा घेतला चावा

कुत्र्याला मारण्याच्या रागावरून माणसाने माणसाचा घेतला चावा

Subscribe

कुत्र्याला मारल्याप्रकरणी एका माथेफिरूने मारहाण करणाऱ्याचा चावा घेतला. मारहाण करणाऱ्याला त्याने बेदम मारले असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

मुक्या जनावरांवर प्रेम करा असा मानवतेचा संदेश सर्वत्र दिला जातो. कुत्री, मांजरे किंवा इतर पक्षी असो त्यांच्या वाटेला न जाणेच सर्वसामान्य माणूस निवडतो. अनेकदा कुत्र्याला त्रास देणाऱ्या लोकांना काही प्राणीप्रेमी हटकतात देखील. मात्र इंदूरमध्ये एका कुत्र्याला त्रास देणाऱ्याला एका प्राणी प्रेमीने चांगलीच अद्दल घडवल्याची घटना समोर आली आहे. कुत्र्याला त्रास दिला म्हणून या माथेफिरूने त्याचा अनेकवेळा चावा घेतला. रवी चव्हाण असे पीडित माणसाचे नाव आहे. इंदूरमधील संजय नगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी ३२४ कलमाअंतर्गत (धोकादायकपणे घातक शस्त्रे किंवा माध्यमांद्वारे दुखापत करणे) गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी या आरोपीला सध्या ताब्यात घेतले आहे. 

कसा घडला प्रकार

पीडित रवी चव्हाण हा संजय नगर परिसरात राहत होता. याच परिसरात असलेल्या एका कुत्र्याला त्याने मारहाण केली होती. आरोपीने ते बघितले व त्याच्याशी भांडण्यास सुरुवात केली. मात्र काही वेळाने हे भांडण शांत झाले. पीडित रवी चव्हाण हा आपल्या घरी गेला. भांडण संपल्यानंतरही त्याचा राग आरोपीच्या डोक्यात होता. त्याने चव्हाणच्या घराचा दरवाजा ठोठावला. चव्हाणने दरवाजा उघडल्यावर त्याने अनेक वेळा चव्हाणचा चावा घेतला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. याघटनेची तक्रार चव्हाणने पोलिसांना केली. सध्या चव्हाण यांच्यावर उपचार सुरु असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -