घरदेश-विदेशत्याने केले तिचे ७ तुकडे

त्याने केले तिचे ७ तुकडे

Subscribe

२१ तारखेला महिलेचा एक अवयव बॉक्समध्ये सापडल्यानंतर पोलिसांकडे महिलेचा शोध घेण्यासाठी कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे या महिलेच्या शरीराचे अन्य तुकडे पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून शोधून काढले. शिवाय आजूबाजूच्या परीसरातील हरवल्याच्या तक्रारींवरही लक्ष ठेवले. पण या मृत महिलेविषयी काहीच माहिती मिळत नव्हती.

दिल्लीतल्या सरीता विहार या परीसरात एका महिलेच्या मृत शरीराचा भाग सापडला आणि एकच खळबळ माजली. पोलिसांना मिळालेला हा मृतदेह एका बॉक्समध्ये सापडला. २१ जूनला हा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. पण या महिलेच्या शरीराचे इतर भाग शोधेपर्यंत या हत्येचा तपास करणे पोलिसांना कठीण जात होते. कारण या महिलेची ओळख पटण्यास अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांनी या घटनेचा मागोवा घेत आरोपी साजिद अली अन्सारीला ताब्यात घेतलं.

कसा लागला छडा!

२१ तारखेला महिलेचा एक अवयव बॉक्समध्ये सापडल्यानंतर पोलिसांकडे महिलेचा शोध घेण्यासाठी कोणताच पर्याय नव्हता. त्यामुळे या महिलेच्या शरीराचे अन्य तुकडे पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून शोधून काढले. शिवाय आजूबाजूच्या परीसरातील हरवल्याच्या तक्रारींवरही लक्ष ठेवले. पण या मृत महिलेविषयी काहीच माहिती मिळत नव्हती. या मृत शरीराचे उरलेले अवयव सापडल्यानंतर एका ठराविक बॉक्समध्ये या शरीराचे अवयव टाकण्यात आल्याचे लक्षात आले . त्या दिशेने पोलिसांनी शोध सुरु केला. कुरीअर कंपनीकडून अधिक माहिती घेतल्यानंतर साजिद अन्सारीचे नाव पुढे आले. साजिदच्या संशयास्पद विधानानंतर पोलिसांचा त्याच्यावरील संशय अधिक बळावला. कारण त्याची बायको जुही काही दिवस घरी नसल्याचे कळाल्यानंतर त्या संदर्भात विचारणा केल्यानंतर तो गोंधळला आणि त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पतीनेच रागात पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले.

- Advertisement -

नेमकं त्या रात्री काय झालं?

साजिदच्या नोकरीवरुन जुही आणि साजिदमध्ये अनेकदा भांडणे व्हायची. साजिदच्या अस्थिर कामामुळे ती नेहमी चिंतेत असायची आणि त्याचाशी वाद घालायची, असे साजिदने पोलिसांना सांगितले. २० आणि २१ तारखेलाही त्यांच्यात असेच भांडण झाले. रागाच्या भरात गळा दाबला. ती मेल्यानंतर त्याने त्याच्या दोन भावांना घरी बोलावले आणि तिच्या मृत शरीराचे ७ तुकडे करुन बॉक्समध्ये भरले आणि फेकून दिले. २०११ साली साजिद आणि जुहीचे लग्न झाले होते. मुळचा बिहारचा असलेला साजिद दिल्लीत राहायला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -