घरताज्या घडामोडीधक्कादायक! मंदिरात एकाने जीभ कापून वाहली तर दुसऱ्याने बळी देण्याचा केला प्रयत्न

धक्कादायक! मंदिरात एकाने जीभ कापून वाहली तर दुसऱ्याने बळी देण्याचा केला प्रयत्न

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये नवरात्री दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी अशा घटना घडल्या आहे, ज्या ऐकून तुम्ही हैराण होऊन जाल.  एकीकडे मंदिरात एका व्यक्तीने स्वतःची जीभ वाहली आहे. तरी दुसरीकडे देवाला खुष करणाऱ्यासाठी एका व्यक्तीने स्वतःचा बळी देण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून त्यांना सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी अशाप्रकारच्या घटना अनेक राज्यातून समोर आल्या होता.

पहिली घटना

पहिली घटना उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यात घडली आहे. या जिल्ह्यातील बबेरू कोतवाली येथील भाटी गावातील आत्मा राम (वय ३२) या व्यक्तीने आपली जीभ कापून मंदिरात वाहली. ज्या घटनेची माहिती समोर येताच घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. त्यानंतर पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळी लगेच धाव घेऊन त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. या व्यक्तीचे वडील म्हणाले की, ‘तो मानसिक आजारात होता. त्यामुळे तो नवरात्री नऊ दिवस उपवास करत होता. कदाचित एखाद्याला व्यक्तीला भुलून त्याने हे कृत्य केले असेल.’

- Advertisement -

दुसरी घटना

दुसरी घटना उत्तर प्रदेशमधील हमीरपूरमध्ये घडली. येथील कुरारा ठाण्यातील क्षेत्रामधील असलेल्या बेरी गावच्या कोटेश्वरी मंदिरात भगवान शंकराला खुष करण्यासाठी स्वतःचा बळी देण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस त्याने आपली मान कापली. हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले गेले. दरम्यान पोलिसांना याप्रकरणी तपास दरम्यान बळी देताना वापरलेले हत्यारही जप्त केले. माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव रुक्मणी शर्मा असे आहे. सध्या या व्यक्ती प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.


हेही वाचा – Video: मानवतेला काळीमा; मुंबईतील पवई येथे कुत्रीवर अमानुष लैंगिक अत्याचार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -