कोरोना नष्ट व्हावा म्हणून त्याने कापली स्वत:ची जीभ…!

जगावर आणि देशावर आलेले हे कोरोनाचे संकट दूर व्हावे व पुन्हा सर्व काही सुरळीत व्हावं म्हणून गुजरातमध्ये एका तरुणाने मा कालीच्या मंदिरात स्व:ताच्या जीभ कुरबान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

knife

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात दिवसागणीक वाढत चालला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे सर्वच ठप्प आहे. दरम्यान, जगावर आणि देशावर आलेले हे कोरोनाचे संकट दूर व्हावे व पुन्हा सर्व काही सुरळीत व्हावं म्हणून गुजरातमध्ये एका तरुणाने मा कालीच्या मंदिरात स्व:ताच्या जीभ कुरबान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवेक शर्मा असे त्या तरुणाचे नाव आहे.


हेही वाचा – मोबाईलची ऑनलाईन विक्री बंदच; या गोष्टींचीच होणार विक्री


विवेक शर्मा हा तरुण मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातला रहिवासी आहे. विवेक त्याचा भाऊ शिवम सोबत शिल्पकाम करायचा. या कामासाठी ते गुजरातमधील बनसकंठा जिल्ह्यातील सुईगाम तालुक्यातल्या नादेश्वरी भागात राहायला आला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापासून त्यांचं काम बंद आहे. विवेक व शिवम हे त्यांच्या आठ साथीदारांसह गावातील एका घरात राहतात. शुक्रवारी विवेक घरासाठी किराणा आणायला जातो असं सांगून घराबाहेर पडला. मात्र बराच वेळ तो परत आला नाही म्हणून शिवमने त्याला फोन केला. दरम्यान, त्याचा फोन दुसऱ्या व्यक्तीने उचलला व शिवमला नादेश्वरी मंदिरात बोलावून घेतलं. तिथे गेल्यावर विवेकने त्याची जीभ कापून देवीला बळी दिल्याचं त्याला समजलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी विवेकवर शस्त्रक्रीया करून त्याची जीभ जोडली आहे.