सेक्स करताना अतिउत्साहाने घेतला तरुणाचा प्राण

सेक्स करताना अतिउत्साह नडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

शरीर संबंध ठेवताना काहीतरी नवीन करण्याच्या नादात गळफास लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. आफ्रिकेमधील मलवाई देशामध्ये एका पुरुषाचा सेक्स करताना मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, शवविच्छेदन केले असता अहवालामध्ये शरीरसंबंध ठेवताना ही व्यक्ती अति उत्साहीत झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे चार्लस माजवा (३५) असे नाव आहे. या व्यक्तीने शरीरविक्री करणाऱ्या महिलेसोबत शरीरसंबंध ठेवत असताना ही व्यक्ती अचानक बेशुद्ध झाली. बेशुद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीसोबत असलेली महिला घाबरली आणि तिने तिच्या मैत्रिणीला फोन करत घडलेला प्रकार सांगितला. नंतर या महिलेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आरोग्य पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालामध्ये या व्यक्तीच्या अति उत्साहामुळे मेंदूमधील नसा फुटल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘डेली स्टार’ने दिलेल्या वृत्तानुसार ही घटना मिगोवी शहरामध्ये घडल्याचे समोर आले आहे.

कोणीही दोषी नाही

शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ‘संबंधित महिलेला दोषी ठरवता येत नाही. तसेच याप्रकरणी कुठल्याही व्यक्ती विरोधात खटला दाखल केला जाणार नाही. तसेच चार्लसचा मृतदेह त्याच्या मूळगावी मातेप्वी येथे पाठवण्यात आला आहे.


हेही वाचा – बायको पळून गेली म्हणून ठेवायचा इतर महिलांशी संबंध आणि नंतर…