घरदेश-विदेशचक्क तीस वर्षांनंतर सुरु केला अॅपलचा पहिला संगणक

चक्क तीस वर्षांनंतर सुरु केला अॅपलचा पहिला संगणक

Subscribe

अॅपल कंपनीचा पहिला संगणक इतिहास जमा झाला आहे. मात्र एका तरुणाला तब्बल ३० वर्षांनंतर हा संगणक सापडला. त्याने याचे फोटो सोशल मीडियावर टाकले.

आज जगभरात अॅपल कंपनी ही एका नावजलेली कंपनी आहे. अॅपल कंपनीच्या संगणकाची किंमत आज लाखोंच्या घरात आहे. मात्र अॅपल कंपनीची सुरुवात देखील एका कंपनीसारखी झाली होती. अॅपल कपंनीने तयार केलेला पहिला संगणक हा काळानुसार इतिहास जमा झाला आहे. मात्र नुकताच तो एका तरुणाला सापडला आहे. हा संगणक चालू अवस्थेत असल्यामुळे या तरुणाचा आनंद गगनात मावला नाही. त्याने याचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकले आहे. तीस वर्षांपूर्वीचा संगणक पाहून इतिहास प्रेमींनी या पोस्टला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. हा संगणक १९८३ मध्ये अॅपल कंपनीने बनवला होता. त्यावेळी हा संगकण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये आलेल्या क्रांतीचे एक प्रतिक होते. जॉन फेफफ नावाच्या तरुणाला हा संगणक सापडला.

- Advertisement -

“ओ माय गॉड. हा संगणक खूप वर्षांनी मी बघितला. माझ्या पालकांनी माझ्या लहानपणी विकत घेतला होता. या संगणकावर मी लहान पणी गेम खेळत होतो. आताही हा चालू अवस्थेत असेल असे वाटले नव्हते.” – जॉन फेफफ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -