घरCORONA UPDATEआईने क्वारंटाईन सेंटरमध्ये रहा म्हटले, म्हणून मुलाने केली आत्महत्या!

आईने क्वारंटाईन सेंटरमध्ये रहा म्हटले, म्हणून मुलाने केली आत्महत्या!

Subscribe

सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास महाराष्ट्रातील सोलापूरपासून सुमारे १४०० कि.मी.चा प्रवास करून मुकेश कुमार आपल्या रांका येथील हातदोहर गावात पोहोचला.

कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण देशात झाला आहे. देशात कोरोना रूग्णांची संख्या ७० हजाराच्या वर पोहचली आहे. लॉकडाऊनमुळे देशातील वेगवेगळ्या भागात लोकं अडकली आहेत. प्रत्येकजण काहीतरी करून घरी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या मुलाला घरी आल्यावर क्वारंटाईन सेंटरमध्ये रहायला सांगितलं म्हणून मुलाने गळफास घेतला आहे.

महाराष्ट्रात काम करणाऱ्या १९ वर्षीय मुलाला कोरोना विषाणूचा धोका ऐकून आईने घरी बोलावले. आईच्या सांगण्यावरून मुलगा देखील अनेकप्राकरचे त्रास सहन करून घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर, जेव्हा या मुलाच्या आईने त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये रहाण्यास सांगितले तेव्हा त्याने आपला जीव दिला.

- Advertisement -

सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास महाराष्ट्रातील सोलापूरपासून सुमारे १४०० कि.मी.चा प्रवास करून मुकेश कुमार आपल्या रांका येथील हातदोहर गावात पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर त्याच्या आईने त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये रहाण्यास सांगितले. पण आईचं म्हणणं त्याने ऐकलं नाही. शेजारच्यांनी समजावून देखील तो क्वारंटाईन सेंटरमध्ये रहाण्यास तयार नव्हता.

थोड्या वेळाने मुकेशने आईला विचारले, आज काय बनवले आहे? यावर आईने सांगितले की बटाट्याची भाजी आणि भात बनविला आहे. यानंतर मुकेशने आपल्या बॅगमधून बिस्किटाचा पुडा काढला, आणि बॅग घेऊन बाहेर निघून गेला.

- Advertisement -

मुकेशने घराजवळील झाडाला गळफास लावून घेतला. मुलगा बराच वेळ परत न आल्यावर त्याची आई त्याला शोधण्यासाठी निघाली. घरापासून थोड्या अंतरावर झाडावर मुलाचा मृतदेह पाहून ती ओरडली. तीचा आवाज ऐकून गावकरी तेथे पोहोचले. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. सध्या पोर्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.


हे ही वाचा – कोरोनाच्या भितीने ‘त्याने’ बहिणीला घरी नेण्याचा निर्णय घेतला, पण वाटेत मृत्यूने गाठले!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -