लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेल्या टेडी बेअरचा झाला स्फोट; पुढे काय झालं वाचा

man hatches conspiracy blow girlfriend daughter detonator 2 people arrested
लग्नात गिफ्ट म्हणून मिळालेल्या टेडी बेअरचा झाला स्फोट; पुढे काय झालं वाचा

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातील वांसदा तालुक्यातील मिंडाबारी गावात एका लग्नात मिळालेल्या गिफ्टचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात वर आणि त्याचा तीन वर्षांचा पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. या दोघांनाही उपचारासाठी नवसारी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाअंती 2 जणांना अटक केली आहे.

या स्फोटाप्रकरणी खुलासा करत सुरत रेंजचे आयजी राजकुमार पांडियन सांगितले की, हा स्फोट मंगळवारी झाला असून या प्रकरणी राजेश पटेल आणि महेश पटेल या आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी राजेश पटेल 2009 पासून जागृती बेन नावाच्या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. दोघांना एक मुलगी देखील झाली, जी सध्या 6 वर्षांची आहे.

राजेश पटेल आधीच विवाहित आहे. त्यांच्या पत्नीचे नाव रंजना बेन असे असून त्याला 2 मुले देखील आहेत, ज्यामध्ये 7 वर्षांची मुलगी आणि 12 वर्षांचा मुलगा आहे. राजेश पटेल आणि जागृती बेन यांच्यातील नात्यात गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला होता. यामुळे राजेशला जागृती बेनपासून कोणत्याही प्रकारे सुटका करून घ्यायची होती.

दरम्यान राजेश पटेल याच्या घरी त्याचा लहान भाऊ दिलीप भाई पटेल यांचे लग्न झाले होते, तर त्यांच्यावेळी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी जागृती बेन हिच्या धाकटी बहीण सलमा हिचेही लग्न होणार होते. याच संधीचा फायदा घेत राजेश पटेल याने एक प्लॅन बनवला. यावेळी जागृती बेनची धाकटी बहीण सलमा हिच्या लग्नाला भेट देण्यासाठी राजेश याने आपल्या ओळखीच्या आशा वर्कर आरती बेनला धाकट्या भावाच्या लग्नाची पत्रिका आणि एक टेडी बेअर दिला.

आरोपी राजेश पटेल याने आशा वर्कर आरती बेन हिला गिफ्ट देताना हे टेडी बेअर जागृतीला नाही तर तिच्या मुलीला द्यायचे असल्याचे सांगितले. पण गिफ्ट देताना आशा वर्कर आरती यांच्याकडून चूक झाली आणि त्यांनी तो टेडी बेअर मुलीला देण्याऐवजी आई जागृतीला दिले. बहिणीच्या लग्नाचे गिफ्ट समजून यानंतर ते टेडी बेअर असलेले गिफ्ट जागृतीने धाकटी बहीण सलमाला दिले.

सलमाचा पती लतेश याने घरी जाऊन लग्नात मिळालेले टेडी बेअर गिफ्ट उघडताच त्याचा स्फोट झाला, त्यामुळे सलमाचा पती लतेशचा हात गमवावा लागला. त्यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. टेडी बेअर गिफ्ट उघडले तेव्हा लतेशचा 3 वर्षांचा पुतण्या जियानही उपस्थित होता, तोही स्फोटात गंभीर जखमी झाला.

सूरत रेंजचे आयजी राजकुमार पांडियन यांनी सांगितले की, राजेश पटेलने त्याच्या ओळखीच्या महेश भाई पटेल यांच्याकडून विहीर खोदण्याच्या नावाखाली प्रेयसी जागृती बेनला बाहेर काढण्यासाठी डिटोनेटर घेतला होता. डिटोनेटर देणाऱ्या महेश पटेलला राजेश पटेलचा हा वाईट हेतू सुध्दा माहीत नव्हता. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेली मैत्रीण जागृती आणि आपल्या मुलीला डिटोनेटरने उडवण्याचा कट रचणारा राजेश पटेलचा ओळखीचा महेश भाई पटेल यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.


चीनच्या नापाक कारवाया सुरूच; Pangong Lake वर बांधला आणखी एक नवा पूल