CoronaVirus LockDown: गडी सिगारेटसाठी फ्रान्सवरून स्पेनला चालत निघाला अन्…!

Man is rescued by helicopter then fined after trying to WALK from France to Spain over the Pyrenees to buy cigarettes during the coronavirus lockdown
CoronaVirus LockDown: गडी सिगारेटसाठी फ्रान्सवरून स्पेनला चालत निघाला अन्...!

सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. जगातील संपूर्ण देशात कोरोना व्हायरस पसरला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये कोरोनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोना व्हायरस फैलाव रोखण्यासाठी अनेक देशांत लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र या लॉकडाऊन दरम्यान एक व्यक्ती त्याच्या व्यसनासाठी चक्क फ्रान्सवरून स्पेनला चालत निघाल्याची घटना समोर आली आहे. हा व्यक्ती लॉकडाऊन दरम्यान सिगारेटसाठी फ्रान्सहून स्पेनला चालत निघाला होता. पण त्याला पिरेनीजमधील पोलिसांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पकडले.

फ्रेंच माऊंटन पोलिसांनी ले पर्थसच्या उंचावरून अत्यंत थंड असलेल्या वातावरणात हरवलेल्या या व्यक्तीची सुटका केली. त्याने कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा भंग केल्यामुळे त्याचे नाव न नोंदवता. या व्यक्तीला १२० डॉलर्स दंड ठोठावण्यात आला आहे.

शनिवारी त्याला पहिल्यांदा पोलिसांनी फ्रान्सच्या भूमध्ये किनाऱ्यावरील पर्पिग्नन येथील घरापासून २० किलोमीटर अंतरावरील कॅटवलोनियामधील जोन्कियरा या स्पॅनिश खेड्यात जाण्यासाठी प्रयत्न करत असताना पकडले होते. जिथे सिगारेट बऱ्यापैकी स्वस्त आहेत. पिरेनीज डोंगरावरून पायी चालत जाण्याच्या प्रयत्नापूर्वी एका चौकीजवळ त्याला अडवले होते. मात्र त्याने काही त्याचा प्रवास थांबवला नाही.

फ्रेंच माऊंटन पोलिसांनी सांगितले की, हा व्यक्ती आमच्या संपर्कात येण्यापूर्वी चालत असताना हरवला होता. एका खाडीत अडकला होता. या व्यक्तीला शनिवारी रात्रीच्या वेळी शोधण्यात आले आणि पेर्पिनीयानमधील एका सुरक्षेत ठिकाणी घेऊन जाण्यात आले. तेथील लॉकडाऊनचे पालन न केल्यामुळे त्याला सुमारे १२० डॉलर्स दंड ठोठावण्यात आला.


हेही वाचा – जगातील हे १२ विषाणू आहेत सर्वात धोकादायक