Mann Ki Batt : भारतात खेळणी उद्योगाला चालना देणार – पंतप्रधान

pm narendra modi visit pune serum institute 28 november

पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज आज, ३० ऑगस्ट रोजी देखील ते ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. ही मोदींची ६८ वी मन की बात होती.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, शेतकरी बांधवांनी कोरोनाच्या या कठिण परिस्थितीमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे. आपल्या देशामध्ये यंदा खरीपाच्या पेरण्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ७ वाढ झाली आहे. यासाठी मी देशातल्या सर्व शेतकरी बांधवांचे अभिनंदन करतो, त्यांच्या परिश्रमाला वंदन करतो.  असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

यंदा सण साधेपणाने

या कोरोनाच्या काळात अनेक सण- उत्सव आले. तरीही लोकांमध्ये तो उत्साह सणांच्या काळात दिसून आला. तरी सगळ्यांनी साधेपणाने उत्सव साजरे केले. देशामध्ये होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये संयम आणि साधेपणाचे यंदा दर्शन होत आहे, हे अभूतपूर्व आहे. अनेक ठिकाणी तर गणेशोत्सवही ऑनलाइन साजरा केला जात आहे

भारतात खेळणी उद्योगाला चालना देणार

जागतिक स्तरावर खेळणी उद्योगाची उलाढाल सात लाख कोटींपेक्षाही जास्त आहे. या सात लाख कोटींमध्ये भारताचा हिस्सा अतिशय कमी आहे, त्यामुळे भारतात खेळणी बनवण्यावर भर दिला जाणार आहे. आजच्या अनेक कंपन्या पुर्वी स्टार्टअप होत्या असं पंतप्रधान मोदी म्हणाले. भारताकडे मोठी परंपरा, संस्कृती असताना खेळण्याच्या बाजारात भारताचा वाटा फारच कमी आहे. पूर्ण आत्मविश्वासने आपल्याला देशाला आत्मनिर्भर बनवायचे आहे. भारताने पर्यावरणाला पुरक ठरतील अशी खेळणी तयार करायला हवीत. कम्प्युटर गेममध्ये देखील परदेशी थीम असण्यापेक्षा भारतातीलच थीम असायला पाहिजेत. आपल्या देशात अनेक कल्पना, अनेक संकल्पना आहेत, आपल्याकडे खूप समृद्ध इतिहास आहे. आम्ही त्यांच्यावर खेळ करू शकतो का ? देशातील तरुणांनी देशातच देशाची खेळणी तयार करावीत… चला खेळ सुरू करूया.

सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा

संपुर्ण सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल, असं सांगितलं. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्र आणि पौष्टिकतेचे खूप चांगले नाते आहे. ‘ यथा अन्नम तथा मन्नम’ म्हणजे जसे आपले अन्न असते, त्या प्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. पोषण किंवा न्यूट्रिशन याचा अर्थ असा नाही की आपण काय खात आहात, आपण किती खात आहात, किती वेळा आपण खात आहात. याचा अर्थ आपल्या शरीराला किती आवश्यक पोषक आहार मिळत आहे, हा आहे. लहानमुलांच्या पोषणावर लक्ष देणं गरजेचं आहे. असेही मोदी म्हणाले.