घरदेश-विदेशबायकोच्या हत्येसाठी त्याने घेतले स्मार्टफोनवर प्रशिक्षण!

बायकोच्या हत्येसाठी त्याने घेतले स्मार्टफोनवर प्रशिक्षण!

Subscribe

शेजारच्या व्यक्तीसोबत पत्नीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन तमिळनाडूच्या विल्लपुरम जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपल्या २८ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या हत्येसाठी त्याने स्मार्टफोनवर ५० पेक्षा जास्त व्हिडिओद्वारे प्रशिक्षण घेतले होते.

आपल्या पत्नीचे शेजारच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तमिळनाडूच्या विल्लपुरम जिल्ह्यातील एका व्यक्तीने २८ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. मृत पत्नीचे नाव पुष्पा असून हत्या करणाऱ्या पतीचे नाव रामादास असे आहे. विशेष म्हणजे रामादासने आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी स्मार्टफोनवर खास प्रशिक्षण घेतले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. हत्या केल्यानंतर एकही पुरावा मागे न राहावा यासाठी त्याने युट्यूबवर ५० पेक्षा जास्त व्हिडिओ पाहून प्रशिक्षण घेतले आहे. हे व्हिडिओ बघितल्यानंतर त्याने आपल्या गर्भवती पत्नीची हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर त्याने आजूबाजूच्या लोकांना आणि नातेवाईकांना आपल्या पत्नीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याचे सांगितले. परंतु, पोलीस तपासातून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

वीस वर्षे मुंबईत राहात होता रामादास

रामादास हा वीस वर्षांपासून मुंबईत राहात आहे. ४ वर्षांपूर्वी त्याने पुष्पा नावाच्या महिलेसोबत लग्न केले होते. लग्नानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. गेल्या चार महिन्यांपासून रामादास आपल्या परिवारासोबत विल्लपुरमला आला होता. गावात आल्यानंतर त्याचे आपल्या पत्नीसोबत वाद वाढले. त्यानंतर पुष्पा आपल्या माहेरी गेली. दरम्यान, रामदासने पुष्पाच्या हत्येचा कट रचला. या हत्येनंतर कुठलाही पुरावा हाती लागू नये यासाठी रामादासने स्मार्टफोनवर हत्येचे ५० हून अधिक व्हिडिओ बघितले.

- Advertisement -

१५ जुलैला तलावात सापडला होता मृतदेह

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, पुष्पाचा मृतदेह १५ जुलैला गावाच्या तलावात सापडले. यानंतर रामादास याने पोलिसांना आपल्या पत्नीचा मृत्यू तलावात बुडून झाला असल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांना शंका आल्यामुले त्याचा मोबाईल जप्त करुन घेतला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात रामादासने आपल्या मोबाईलमधील बरेच व्हिडिओ डिलीट केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी रिकवरी सॉप्टवेअरच्या आधारे डिलीट केलेले व्हिडिओ पुन्हा रिस्टोअर करून घेतले. हे सर्व हत्येचे व्हिडिओ असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या चौकशीत गुन्हा केला कबूल

व्हिडिओची बाब समोर आल्यावर पोलिसांनी शनिवारी रामादासला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने आपला गुन्हा मान्य केला. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबतत पत्नीचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन तिला मारुन टाकल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने कुठलाही पुरावा शिल्लक न राहावा, यासाठी मोबाईलमधील व्हिडिओ डिलीट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -