घरदेश-विदेशCorona: मास्क घातलं नाही म्हणून दिव्यांग मुलाचा वडिलांनी घेतला जीव!

Corona: मास्क घातलं नाही म्हणून दिव्यांग मुलाचा वडिलांनी घेतला जीव!

Subscribe

कोरोना व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असताना अशा गंभीर परिस्थितीत या हत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ

लॉकडाऊन दरम्यान घराबाहेर पडताना मास्क घातले नाही म्हणून झालेल्या भांडणात वयवर्ष ७८ असणाऱ्या व्यक्तीने आपल्या ४५ वर्षीय दिव्यांग मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोलकातामध्ये शनिवारी संध्याकाळच्या वेळेस घडला. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून कोरोना व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असताना अशा गंभीर परिस्थितीत या हत्येच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घडलेल्या प्रकारानंतर त्या व्यक्तीने स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

असा घडला प्रकार

कोलकाता वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले की, ‘संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी वंशीधर मलिक श्यामपुकुर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी आपल्या मुलाची श्रीशेंदू मलिकला सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हत्या केल्याचे सांगितले. मुलगा दिव्यांग होता. आरोपीने कपड्याच्या सहाय्याने मुलाची गळा आवळून हत्या केली होती.’ ही घटना समजताच घटनास्थळी स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी दाखल होऊन कोलकाता पोलिस पथकानेही या हत्येबद्दल माहिती घेतली.

- Advertisement -

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी हा एका खासगी कंपनीचा सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्याचा मुलगा बेरोजगार होता. तो लहानपणापासूनच दिव्यांग होता. वडील-मुलाची सारखी भांडणं व्हायची. मिळालेल्या माहितीनुसार, वडील-मुलाचे मास्कवरून भांडण झाले. वास्तविक, आरोपीचा मुलगा लॉकडाऊनमध्ये घराबाहेर जात होता. यावर, त्याच्या वडिलांनी त्याला मास्क घालण्यास सांगितले, पण यामुळे तो रागावला. हळूहळू या प्रकरणात वडील आणि मुलगा यांच्यात भांडण वाढले असून त्यातून हत्येचा घटना घडली. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.


होम क्वारंटाईन शिक्के पाण्याने धुवून लोक घराबाहेर; पुण्यात एकच खळबळ!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -