संतापजनक! एका क्षुलल्क कारणासाठी दोन्ही मुलांनी वडिलांची हत्या केली!

वडिलांच्या हत्येचा दोन भाऊ आणि आईने हा कट रचला.

मृत्यू

तेलंगणमध्ये मुलाने आपल्याच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलाच्या कटात छोटा भाऊ आणि आईनेही साथ दिल्याचं उघड झालंय. पेड्डपल्ली जिल्ह्यातील कोथुर गावात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही भावांना ताब्यात घेतलं आहे. मात्र आई फरार आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन मोबाईल आणि हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला टॉवेलही ताब्यात घेतला आहे. या मुलांचे मृत वडिल एका कंपनीत पंप ऑपरेटर म्हणून काम करत होते. या दोन्ही मुलाला वडिलांच्या जागी नोकरी करायची होती. कारण सरकार यांच्या संयुक्त भागीदारीतून तयार झालेल्या या कंपनीत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना नोकरी मिळण्याचा नियम आहे. यासाठी दोन भाऊ आणि आईने हा कट रचला. मुलाने आपल्या वडिलांची रात्री झोपेत असताना टॉवेलने गळा आवळून हत्या केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी या मुलाने शेजारील व्यक्तींना वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचा बनाव केला आहे. शेजारच्यांना संशय आल्यामुळे त्यांनी या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलीस चौकशीत कारण आलं समोर

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली आहे. मोठ्या भावाने आपल्याला नोकरी मिळेल असं कारण सांगितल्यानंतर लहान भाऊ आणि आई त्याला मदत करायला तयार झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही भावांवर हत्या आणि तपासात पोलिसांना खोटी माहिती दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हे ही वाचा – आकडे लपवण्याच्या नादात धारावीत टेस्ट केल्या नाहीत – प्रवीण दरेकर