घरताज्या घडामोडीमोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून त्याने हतोडीने वार करुन तिला संपवलं!

मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून त्याने हतोडीने वार करुन तिला संपवलं!

Subscribe

दिल्लीत एका धक्कादायक घटना घडली आहे. एका ३९  वर्षीय व्यक्तीने एका ३५ वर्षीय महिलेची हत्या केली आहे. हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहात होते. या महिलेने पुरूषाला आपल्या मोबाईलचा पासवर्ड दिला नाही या रागात त्या पुरूषाने तीच्यावर हातोडीने हल्ला केला. यात महिलेचा मृत्यू झाला. आरोपीने आपल्या हत्येची कबूली पोलिसांकडे दिली आहे. मागच्या आठवड्यात मंगळवारी विनोद नगरमध्ये ही घटना घडली. शनिवारी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मयत ममता शर्मा ही पीडित महिला खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करायची. मंगळवारी संध्याकाळी तिची १७ वर्षीचा मुलगा घरी परतली असता तिला आपली आई मृत अवस्थेत आढळले. त्यावेली तीला आईच्या शरीरावर पडलेला एक हातोडा देखील सापडला. या बाबत तीने लगेचच पोलिसांना याबाबत कळवले.

- Advertisement -

पोलिसांना आधिपासूनच संशय होता की या महिलेबरोबर राहणारा ब्रह्मपाल सिंगने हत्या केली असावी. कारण तो हत्येच्या दिवसापासून गायब होता. सिंह यांच्या स्थानाबद्दल कुणीतरी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर त्यांना शनिवारी अक्षरधाम मंदिराजवळून अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

मृत महिला तीन वर्षांपूर्वीच आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. “सुमारे दोन वर्षांपूर्वी तिची भेट ब्रह्मपाल सिंगशी झाली, तो तीन मुले असलेला विवाहित पुरुष होता. त्यानंतर दोघांनी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी विनोद नगरमध्ये फ्लॅट घेतला आणि एकत्र राहण्यास सुरूवात केली. यावेळी या महिलेचा मुलगाही त्यांच्याबरोबर रहायला आला. मात्र काही दिवसांनी सिंग यांना या महिलेबरोबर राहण्याची इच्छा नव्हती. यावेळी ही महिला दुसऱ्या व्यक्तीशी संपर्कात असल्याचा संशय सिंगला आला. यावेळी त्याने मोबाईलचा पासवर्ड विचारला असता महिलेने तो देण्यास नकार दिला. यावेळी रागाच्या भरात त्याने महिलेवर हातोडीने वार करायला सुरूवात केली. यात महिलेचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘पोस्टमॉर्टमच्या १०-१२ तास आधीच सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू!’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -