घरदेश-विदेशलॉकडाऊनमध्ये एकटेपणा वाढला, मग स्वतःलाच विकायला काढले

लॉकडाऊनमध्ये एकटेपणा वाढला, मग स्वतःलाच विकायला काढले

Subscribe

कोरोनामुळे देशभरात अनेल लोकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अनेकांचा स्वभाव चिडचिडीचा होतानाच काही जणांना मानसोपचार तज्ञांचाही सल्ला घ्यावा लागला अशी उदाहरणे समोर आली. पण लॉकडाऊनमधील एकटेपणाला कंटाळून थेट स्वतःचाच सेल फेसबुकवर लावणारी एक व्यक्ती सध्या व्हायरल होत आहे. लॉकडाऊन काही संपत नाही आणि मी माझ्या एकटेपणाला आता कंटाळलो आहे, असे सांगतच या व्यक्तींनी स्वतःलाच विकायला काढले आहे.

ब्रिटनमधील नॉर्थशायर येथे राहणाऱे ३० वर्षीय एलन क्लेटॉन एक गेल्या १० वर्षांपासून एकटेच आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक डेटिंग एपचा वापर करून पार्टनर शोधण्याचा प्रयत्न केला. पण कोणताच पार्टनर न मिळाल्याने अखेर त्यांनी स्वतःलाच विकायला क्लुप्ती लढवली. एलन हे स्वतः ड्रायव्हिंग प्रोफेशनमध्ये काम करतात. त्यांनी मी विक्रीसाठी उपलब्ध असून वापरासाठी अतिशय चांगल्या स्थितीत असल्याचे जाहीर केले. स्वतःला विक्रीसाठी तयार असणाऱ्या एलन यांच्या फेसबुक पोस्टला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच एलन यांची फेसबुक पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर आणि व्हायरल झाली आहे. त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांचा फोटोही व्हायरल झाला आहे. या पोस्टवर कमेंट करत काही मुलींनी त्यांच्यासोबत डेटवर जाण्याची इच्छाही व्यक्त केली होती. पण डेटमधूनही कोणताच पार्टनर न मिळाल्याने त्यांनी स्वतःलाच विकायला काढले आहे.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -