
Kailash Kher Attacked: चाहते कलाकारांवर भरभरून प्रेम करतात, पण कधी कधी कलाकारांना त्यांच्या चाहत्यांच्या रोषाला सामारे जावं लागतं. असाच प्रसंग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यासोबत घडलाय. सुफी संगीतातील एक लोकप्रिय नाव म्हणजे प्रसिद्ध गायक कैलाश खेर होय… देशातील सर्वांवर त्यांनी आपल्या सुरांची जादू पसरवली आहे. पण एक म्युझिक कॉन्सर्ट सुरू असताना स्टेजवर असलेल्या गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी कैलाश खेर कर्नाटकात एका म्युझिक कॉन्सर्टसाठी आले होते. स्टेजवर परफॉर्मन्स देत असताना अचानक एका व्यक्तीने कैलाश खेर यांच्यावर पाण्याची बाटली फेकून हल्ला केला. मात्र, कैलाश खेर यांना किती दुखापत झाली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कैलास खेर यांना घटनास्थळी उपस्थित जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. जमावात उपस्थित दोन लोकांनी त्याच्याकडे कन्नड गाण्याची मागणी करण्यास सुरुवात केली, पण कैलास खेर यांनी कन्नड गाणं न गायल्यानं वातावरण तापलं. याचा राग अनावर होऊन जमावात असलेल्या दोन व्यक्तींनी कैलास खेर यांच्यावर पाण्याची बाटलीच फेकली. हा प्रकार पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवून दोन जणांना अटक केली.
कैलाश खेर यांनी सोमवारी ‘हे’ ट्विट केले
कैलाश खेर यांनी सोमवारी सकाळी एक ट्विट केलंय, ज्यामध्ये ते हम्पी उत्सवादरम्यान कन्नडमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. त्यांनी लिहिले, “जेव्हा पुनीत राजकुमार जी यांना कैलासाने संगीतमय आदरांजली दिली आणि त्यांच्यावर चित्रित केलेल्या आमच्या कन्नड गाण्यांची सीरिज सादर केली. संपूर्ण विजयनगर सोबत गात होता…नाचत होता…आणि भावूक होता. मात्र हंपी उत्सव 2023 लाइव्ह कॉन्सर्टचा चा शेवट खूपच भावूक होता….” असं लिहीत त्यांनी म्युझिक कॉन्सर्टचा एक व्हि़डीओ देखील शेअर केलाय.
जब पुनीत राजकुमार जी को कैलासा संगीतमय श्रद्धॉंजली दी.और एक गीत श्रृंखला उन्हीं पे फ़िल्माये हमारे कन्नड़ा गीतों की प्रस्तुत की.पूरा विजयनगर साथ गा रहा,झूम रहा,भावाकुल हो रहा @bandkailasa संग. #KailasaLiveInConcert का #HampiUtsav2023 का समापन बहुत भावनात्मक रहा. @kkaladham pic.twitter.com/FqqTpLdk3V
— Kailash Kher (@Kailashkher) January 30, 2023
एखाद्या कलाकारावरचा हा हल्ला खरोखरंच सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देणारी ही घटना आहे. या घटनेमुळे राज्याच्या प्रशासन व्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.