घरताज्या घडामोडीNSA Ajit Doval: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या बंगल्यात एका व्यक्तीचा...

NSA Ajit Doval: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या बंगल्यात एका व्यक्तीचा घुसण्याचा प्रयत्न

Subscribe

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval) यांच्या दिल्लीतील जनपथ रोडवरील बंगाल्यात एका अज्ञात व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. कडक सुरक्षा असल्यामुळे आरोपी व्यक्तीचा अजित डोवाल यांच्या बंगाल्यात घुसण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. या संबंधित व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. तसेच हे चुकून घडले की यामागे कोणता कट आहे? याचा पोलीस तपास करत आहे. मात्र अशा पद्धतीने देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बंगाल्यात घुसणे हे चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

माहितीनुसार, अजित डोवाल यांच्या बंगाल्यात घुसणारा व्यक्ती कर्नाटकातला असल्याचे म्हटले जात आहे. तसेच दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा व्यक्ती मतिमंद असल्याचे कळाले असून त्याच्याकडून जी गाडी जप्त करण्यात आली आहे, ती भाड्याचे असल्याचे समोर आले आहे.

इंडिया जेम्स बाँड म्हणून अजित डोवाल लोकप्रिय

उत्तराखंडच्या पौडी गढवालमध्ये जन्मलेले एनएसए अजित डोवाल मोदी सरकारमध्ये सर्वात शक्तिशाली नोकरशहा आहेत. अजित डोवाल केरळ कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. २००५मध्ये डोवाल इंटलीजेंस ब्युरो (आयबी)चे संचालक म्हणून निवृत्त झाले होते. डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. तसेच डोवाल यांना भारताचे जेम्स बाँड म्हणून ओळखले जाते.

- Advertisement -

हेही वाचा – Ashwani Kumar resigns: पंजाब काँग्रेसला मोठा धक्का, अश्विनी कुमार यांचा काँग्रेसला रामराम


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -