घरदेश-विदेशLockDown: इंस्टाग्रामवर पठ्ठ्यानं शोधले ग्राहक; तिप्पट किंमत घेत विकली दारू

LockDown: इंस्टाग्रामवर पठ्ठ्यानं शोधले ग्राहक; तिप्पट किंमत घेत विकली दारू

Subscribe

संधीचा फायदा घेत पठ्ठ्याने सोशल मीडियाचा आधार घेत इंस्टाग्रामवर मद्यविक्री सुरू केली

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. यादरम्यान सगळेच आपल्या घरात रहाणं पसंत करत आहे. मात्र ज्या लोकांना काही ठराविक गोष्टींचे व्यसन आहे त्या लोकांना आपल्या व्यसनाशी तडजोड करावी लागत आहे. या संधीचा फायदा घेत एका पठ्ठ्याने सोशल मीडियाचा आधार घेत इंस्टाग्रामवर मद्यविक्री सुरू केली आहे. लॉकडाऊन आणि कर्फ्यूचा फायदा घेत बंगळुरुच्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर आपले ग्राहक शोधायचे ठरवले.

लॉकडाऊन असताना केली दारू विक्री

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, किरण नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामच्या सहाय्याने एमआरपीच्या किंमतीपेक्षा तीनपट किंमती घेत ग्राहकांना मद्य विक्री केली. लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करत हा पठ्ठ्या दारू विक्री करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्ती लॉकडाऊन दरम्यान सेवानिवृत्त कर्मचार्‍याच्या मदतीने डिफेन्स कॅन्टीनमधून दारू खरेदी करत होता आणि ती दारू अधिक किंमतीला विकत होता. लॉकडाऊन कालावधीत जास्तीत जास्त पैसे कमविणे हे त्या व्यक्तीचे एकमेव लक्ष्य असल्याने त्याने असा प्रकार केला.

- Advertisement -

सोशल मीडियाच्या माध्यमातून हा पठ्ठया त्याच्या ग्राहकांशी संपर्क साधायचा. ग्राहकाच्या मागणीनुसार तो ग्राहकाला दारूची थेट डिलिव्हरी देखील देत नव्हता. कोणी दारूची मागणी केल्यास तो डिलिव्हरीपूर्वी तो ऑनलाईन पेमेंट घ्यायचा. पैसे मिळाल्यानंतर तो एका सुनसान जागी दारूच्या बाटल्या लपवायचा आणि त्या जागेचा पत्ता आपल्या ग्राहकाला कळवायचा.


Corona: दारू न मिळाल्यानं जीव वेडापिसा; पठ्ठ्यानं चक्क लुटलं दुकान!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -