घरताज्या घडामोडीLockdown: २५ दिवस, २८०० किमीचा प्रवास; गुजरातमधून चालत गाठलं आसाम

Lockdown: २५ दिवस, २८०० किमीचा प्रवास; गुजरातमधून चालत गाठलं आसाम

Subscribe

४६ वर्षीय व्यक्ती गुजरातमधून २८०० किलोमीटर अंतर प्रवास करत घरी पोहोचला. परराज्यातून आल्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली असून त्याला १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे सर्व कंपन्या बंद झाल्या. यामुळे अनेकांचे रोजगार गेले. कामासाठी दुसऱ्या राज्यात गेलेल्या मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. हातातून काम गेल्यानंतर मजुरांनी गावची वाट पकडली. लॉकडाऊनमध्ये दळणवळणाच्या सेवा बंद झाल्याने लोक पायी चालत निघाले. आसाममधील एक व्यक्ती तब्बल २ हजार ८०० किमी चालत गुजरातमधून आसामला पोहोचला. आसाममधील नौगाव जिल्ह्यातील जादव गोगोई (वय ४६) कामाच्या शोधात गुजरातमध्ये गेला होता. तेथे तो गुजरातमधील औद्योगिक शहर वापी येथे मजूर म्हणून काम करत होता. २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केलं गेलं, त्यानतर त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं. त्यामुळे त्याच्याकडे घरी जाण्याशिवाय पर्याय नव्हता. २७ मार्च रोजी जादव यांनी वापी येथून चालायला सुरवात केली. वाटेत जर एखादं आपात्कालीन वाहन मिळालं तर त्यातुन काही अंतर प्रवेश करत होता. असं करत करत जादव तब्बल २५ दिवसांनी नागाव जिल्ह्यातील राहा भागात आपल्या घरी पोहोचला. याबाबतचं वृत्त आज तक या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.


हेही वाचा – अमेरिकेत २ कोटी लोक बेरोजगार; पोट भरण्यासाठी फूड बँकांवर अवलंबून

- Advertisement -

जादव वापी येथून घरी जायला निघाला तेव्हा त्याच्या हातात फक्त ४ हजार रुपये होते. घरी पोहोचताना त्याने देशातील आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी रस्त्यावर धावणाऱ्या ट्रकचालकांची मदत घेतली. या प्रवासादरम्यान त्याचे पैसे, मोबाईल व इतर सामानही लुटलं. जेव्हा तो राहा येथे रस्त्याच्या कडेला आराम करत होता, तेव्हा स्थानिक लोकांनी पोलिसांना बोलावून घेतलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल करुन त्याची चाचणी केली. त्याची प्रकृती ठीक आहे, मात्र परराज्यातून आल्यामुळे त्याला १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -