दोन लग्न करणं पडलं महागात, दुसऱ्या बायकोला द्यावे लागणार ६० लाख रूपये!

सध्या कोर्टाने त्या माणसाला चार आठवडे आधी सहा लाख रूपयो कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत ही घटना घडली आहे.

Marriage
प्रातिनिधिक छायाचित्र

दोन मुलं असणाऱ्या एका माणसाला दुसरं लग्न करणं चांगलच महागात पडलं आहे. आता त्याला आपली जागा विकून ६० लाख रूपये दुसऱ्या बायकोला द्यावे लागणार आहेत. पण बायकोलाही हे पैसे तेव्हाच मिळणार आहेत जेव्हा ती हिंदू मॅरेज अऍक्ट १३ ब अनुसार आपल्या मर्जीने नवऱ्याविरोधात घटस्फोटाची याचिका कोर्टात वेळे आधी सादर करेल.

सध्या कोर्टाने त्या माणसाला चार आठवडे आधी सहा लाख रूपयो कोर्टात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत ही घटना घडली आहे. २००४ मध्ये लग्न केल्यानंतर वर्षभरानंतर नवरा बायकोमध्ये भांडणाला सुरूवात झाली. पत्नीने घरगुती हिंसा १२ च्या अनुसार कोर्टात याचिका दाखल केली. महिला कोर्टाने हा अधिकार महिलेला दिला. मात्र या दरम्यान आधिच्या बायकोच्या दोन मुलांनी कोर्टात मालमत्तेच्या वाटणीसाठी याचिका दाखल केली. कोर्टाने घराचे तीन भाग केले. दोन हिस्से दोन मुलांना आणि एक वडिलांना.

न्यायमुर्ती यूयू ललित यांच्या खंडपीठाने हे आदेश महिलीने केलेल्या याचिकेवर दिला. कोर्टाने सांगितले की, घर विकण्याची कार्यवाही ३ महिन्याच्या आत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यातील २ कोटी रूपये कोर्टात जमा केले जाणार आहेत. यातील ६० लाख रूपये घटस्फोट घेतलेल्या पत्नीला देण्यात येतील आणि उर्वरीत दोन भार मुलांमध्ये वाटण्यात येतील.

पतीला यातील काहीच मिळणार नाहीये. त्याला फक्त आपल्या दुसऱ्या बाकोला घटस्फोट द्यायचा आहे. दोन आठवड्याच्या आत पत्नी याचिका दाखल करू शकते. तर आठ आठवड्याच्या आत घर खाली करायला सांगितले आहे. म्हणजे तो त्याला लवकरात लवकर विकू शकेल.


हे ही वाचा – पहिला चॉकलेट बॉय