घरदेश-विदेशपॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत मानसीने पटकावले पहिले सुवर्णपदक

पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत मानसीने पटकावले पहिले सुवर्णपदक

Subscribe

भारतीय बॅडमिंटनसाठी रविवारचा दिवस हा ऐतिहासिक ठरला. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पी.व्ही.सिंधू ही पहिली बॅडमिंटन खेळाडू ठरली आहे. यानंतर जगभरातून पी.व्ही सिंधूवर कौतुकाचा वर्षाव होत असताना अजून एका भारतीय बॅडमिंटनपटूने सुवर्णपदकावर नाव कोरले होते. वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत मानसी जोशी या भारतीय बॅडमिंटनपटूने सुवर्ण पदक पटकाविले आहे. पी.व्ही सिंधूने सुवर्ण पदक जिंकण्यापूर्वी मानसीने सुवर्ण पदक पटकावले होते. शनिवारी मानसीने स्विझर्लंडमधील वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पारुल परमार याचा पराभव करून पहिल्यांदा सुवर्ण पदाकावर नाव कोरले होते. बॅडमिंटनपटू पारुल परमार समोर मानसी तीन वेळा सामोरे गेली होती. प्रत्येक वेळी ती पराभूत झाली. मात्र, यावेळी तिने हार मानली नाही.

- Advertisement -

मानसीने तिच्या परिस्थितीवर मात करून हे सुवर्णपदक मिळवले आहे. अपंग असलेल्या मानसीला तिचा एक पाय नसल्याने त्या पायाच्या ठिकाणी कृत्रिम पाय बसविण्यात आला आहे. अशा परिस्थितीत तिने सुवर्णपदक पटकावले आहे. ‘मी हे सुवर्णपदक मिळवण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले होते. मी खूप आनंदी आहे. माझे कष्ट हे कामी आले आहे. तसेच हे माझे पहिले सुवर्णपदक आहे.’

Really happy to share with you that I won a Gold in The BWF Para Badminton World Championships 2019. I worked really…

Manasi Joshi ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 25, 2019

- Advertisement -

यावर्षी भारताने वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण १२ पदक जिंकली आहेत. मानसी आणि सिंधू या दोघींचे गोपीचंद हे गुरु आहेत. हैदाराबाद येथील गोपीचंद यांच्या अॅकॅडमीमध्ये या दोघी बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत आहे. यावर्षी या दोन्ही शिष्यांनी त्याच्या गुरुंना सुवर्णपदकाची गुरुदक्षिणा दिली आहे.

सोशल मीडियावरून मानसीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मानसीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टि्वटच्या माध्यमातून कौतुक केले आहे. तसेच नेटकऱ्यांनी सिंधूच्या ऐतिहासिक निर्णयानंतर मानसीच्या यशाचा विसर पडल्याची खंत देखील व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -