घरदेश-विदेशउत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणे अनिवार्य

उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणे अनिवार्य

Subscribe

उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एस एन पांडे यांनी 9 मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकार्‍यांना याबाबत आदेश जारी केला आहे. 24 मार्च रोजी बोर्डाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये प्राथनेच्या वेळी राष्ट्रगीत गाणे अनिवार्य करण्यात आले आहे, असे आदेशात म्हटले आहे.

रमजानच्या महिन्यात मदरशांना 30 मार्च ते 11 मे  सुट्टी जाहीर करण्यात आली होती. 12 मे पासून मदरशे नियमित सुरू झाले होते. त्यामुळे आजपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. राज्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये येत्या शैक्षणिक सत्रापासून मदरशे सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना इतर प्रार्थनेसह राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे, असे पांडे म्हणाले. या आदेशाचे पालन व्हावे यासाठी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना नियमितपणे देखरेख करावी लागणार आहे.

- Advertisement -

आत्तापर्यंत मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी सहसा हमद आणि सलाम वाचले जात होते. काही ठिकाणी राष्ट्रगीतही गायले जात होते, मात्र ते बंधनकारक नव्हते. आता ते अनिवार्य करण्यात आले आहे, असे शिक्षक संघ मदारीस अरबियाचे सरचिटणीस दिवाण साहेब जमान खान यांनी सांगितले

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -