केंद्रीय मंत्री मनेका गांधींचा तनुश्रीला पाठिंबा

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी आता तनुश्रीच्या विषयावर वक्तव्य केले आहे. आपल्या देशात महिलांवरील अत्याचाराला थारा नाही, असेही त्या म्हणाल्या.

Maneka gandhi
केंद्रीय मंत्री मनेका गांधी (सौजन्य-एएनआय)

गेल्या कित्येक दिवसांपासून तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या छेडछाडीच्या आरोपवर चर्चा रंगत आहेत. या चर्चेत राखी सावंतनेही हस्तक्षेप करत तनुश्रीला खोटारडी म्हटलंय. तर काही सेलिब्रिटींनी तनुश्रीची बाजू घेत या विषयावर आपले मत मांडले. मात्र आता केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी आता तनुश्रीच्या विषयावर वक्तव्य केले आहे.

काय म्हणाल्या मनेका गांधी

देशात कोणताही छेडछाडीचा प्रकार दुर्लक्षित केला जाणार नाही. आमच्या सरकारने या पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून शी बॉक्स हे कॅम्पेन सुरू केले. यामध्ये पीडित महिला आपली व्यथा मांडू शकते. त्यानुसार त्वरीत कारवाईचे पाऊल उचलले जाईल.

मी टु भारत कॅम्पेन सुरू राहावे 

अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या प्रकरणावरून मनेका गांधी यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी महिलांच्या होणाऱ्या अत्याचाराबाबत वक्तव्य केले. तसेच महिलांच्या शोषणासंदर्भात आवाज उठवणे आवश्यक असून मी टु भारत हे कॅम्पेन सुरू राहायला हवे, असेही त्या म्हणाल्या.