माणिक साह त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान, मोदींसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्याचा सहभाग

नवी दिल्ली : माणिक साहा यांनी दुसऱ्यांदा त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. माणिक साहा यांनी त्रिपुराची राजधानी अगरताला येथील स्वामी विवेकानंद मैदानावर सलग दुसऱ्यांदा त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी माणिक साहा यांनी सोमवारी ६ मार्चला राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.

रतनलाल नाथ, प्रांजित सिंघ रॉय, प्रांजित सिंघ रॉय आणि सुशांत चौधरी यांनी देखील मुख्यमंत्री माणिक साहाच्या शपथविधी समारंभात अगरताला येथे त्रिपुराचे मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. रतनलाल नाथ हे मोहनपूरचे आमदार असून ते आधी बिपलाव्ह देव यांच्या सरकारमध्येही मंत्री होते. सुशांत चौधरी हे मजलिशपूर असेंब्लीचे आमदार आहेत. तसेच, पॅन्चरथल असेंब्लीचे आमदार सान्ताना चकमा यांनी देखील शपथ घेतली आहे. या व्यतिरिक्त, टिंकू रॉय यांनी देखील शपथ घेतली आहे.

हेही वाचा – नागालँडच्या राजकारणात पवारांची खेळी, भाजप आघाडीला राष्ट्रवादीचा पाठिंबा

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीबद्दल सांगायचे तर भाजपाने 32 जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर टिप्रा मोथा पार्टी 13 जागा जिंकून दुसर्‍या क्रमांकावर होती. त्याचवेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला (मार्क्सवादी) 11 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या.

कोणत्या आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
रतनलाल नाथ
संतना चकमा
सुशांत चौधरी
टिंकू रॉय
प्रांजित सिंह रॉय
बिकास डेबर्मा
सुधंगासू दास
शुक्ला चरण नोटीया

पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी समारंभात उपस्थित
मानिक साहा यांनी दुसऱ्यांदा त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदीसह अमित शाह, जे.पी. नड्डा आणि भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते.

माणिक साहा यांनी राज्यपालांकडे सोपवला होता राजीनामा
माणिक साहा यांनी शुक्रवारी ३ मार्चला अगरतला येथील राजभवन येथे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. राज्यपालांनी नवीन सरकार शपथ घेईपर्यंत त्यांना पदावर राहण्यास सांगितले होते.