Homeदेश-विदेशManipur Violence : मणिपूरमध्ये भडकलेल्या हिंसाचारावरून मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; म्हणाले...

Manipur Violence : मणिपूरमध्ये भडकलेल्या हिंसाचारावरून मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी; म्हणाले…

Subscribe

वर्षभरापासून ईशान्येकडील मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतो आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी यासंदर्भात आज (31 डिसेंबर 2024) पत्रकार परिषदेत माफी मागितली आणि लवकरच राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले.

इंफाळ : वर्षभरापासून ईशान्येकडील मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतो आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी यासंदर्भात आज (31 डिसेंबर 2024) पत्रकार परिषदेत माफी मागितली आणि लवकरच राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचे आश्वासन दिले. (manipur chief minister biren singh saying sorry to the people of manipur forgive me for whatever happened)

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी गेल्या वर्षभरात राज्यात घडलेल्या घटनांबद्दल दुःख व्यक्त केले आणि जनतेची माफी मागितली आहे. ते म्हणाले, हे संपूर्ण वर्ष अत्यंत वाईट, खराब गेले आहे. मला याबद्दल अत्यंत खेद आहे. 3 मे पासून आजपर्यंत राज्यात जे काही घडले आहे, त्यासाठी मी माफी मागतो. या घटनांमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्यांनी गमावले आहे तर काहींना आपले घरदारच सोडून जावे लागले आहे. या सगळ्याचाच मला पश्चात्ताप असल्याचेही सिंह म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, राज्यात शांतता निर्माण व्हावी म्हणून गेल्या 3 – 4 महिन्यात बरेच प्रयत्न करण्यात आले आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच नवीन वर्ष 2025 मध्ये मणिपूरमध्ये पूर्णपणे शांतता नांदेल अशी आशा व्यक्त केली आहे. राज्यातील सगळ्या समुदायांना आवाहन करत ते म्हणाले की, गेल्या वर्षात जे झाले ते झाले, पण येऊ घातलेल्या या नवीन वर्षात जुन्या चुका विसरून, टाळून सर्व जाती – समुदायांना एकत्र राहण्याचे आवाहन केले. आपल्याला सर्वांना एकत्र येऊन एक शांत आणि समृद्ध मणिपूर निर्माण करायचा असल्याचेही ते म्हणाले.

मणिपूरमधील हिंसाचारावरून मुख्यमंत्री सिंह हे वर्षभर विरोधकांच्या निशाण्यावर राहिले आहेत. मात्र, आता येथील परिस्थिती सुधारत असल्याचे सिंह म्हणाले. चर्चा आणि संवादामुळे येथील परिस्थिती निवळते आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने आधीच पावले उचलली असल्याचेही सिंह म्हणाले.

- Advertisement -

मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासूनच मैतेई आणि कुकी समाजांदरम्यान आरक्षण तसेच आर्थिक लाभांवरून काही न काही वाद सुरू आहेत. ज्याचे नंतर मोठ्या हिंसाचारात, जाळपोळीत रुपांतर झाले. या हिंसाचारात जवळपास 200 हून अधिक लोक मारले गेले तर हजारो लोक विस्थापित झाले. या हिंसाचारावरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकेची झोड उठवली. पंतप्रधान तसेत गृहमंत्र्यांनी मणिपूरला भेट न दिल्याबद्दलही त्यांच्यावर तोंडसुख घेतले होते.


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -