Eco friendly bappa Competition
घर क्राइम शाळेला दांडी मारल्याची शिक्षा टाळण्यासाठी 3 मुलींनी रचली अशी कहाणी की उडाली...

शाळेला दांडी मारल्याची शिक्षा टाळण्यासाठी 3 मुलींनी रचली अशी कहाणी की उडाली खळबळ; नेमकं घडलं काय?

Subscribe

शाळेला दांडी मारल्यानं शिक्षेपासून वाचण्याच्या प्रयत्नात शाळकरी मुलींनी अशी काही कहाणी रचली की मणिपूर प्रशासनाला वेठीस धरलं. शाळेला दांडी मारलेल्या विद्यार्थिनींनी सांगितले की, तीन जणांनी 20 शाळकरी मुलींचं अपहरण केलं होतं. राज्याची राजधानी इंफाळच्या सीमेवर असलेल्या नंबोल शहरात मुलींनी शाळेला दांडी मारली होती. पोलीस सूत्रांनी सांगितले की, त्या मुलींची कसून चौकशी केल्यानंतर समजलं की भीतीमुळे या मुलींनी खोटी काहाणी सांगितली.

इम्फाळ: शाळेला दांडी मारल्यानं शिक्षेपासून वाचण्याच्या प्रयत्नात शाळकरी मुलींनी अशी काही कहाणी रचली की मणिपूर प्रशासनाला वेठीस धरलं. शाळेला दांडी मारलेल्या विद्यार्थिनींनी सांगितले की, तीन जणांनी 20 शाळकरी मुलींचं अपहरण केलं होतं. राज्याची राजधानी इंफाळच्या सीमेवर असलेल्या नंबोल शहरात मुलींनी शाळेला दांडी मारली होती. पोलीस सूत्रांनी सांगितले की, त्या मुलींची कसून चौकशी केल्यानंतर समजलं की भीतीमुळे या मुलींनी खोटी काहाणी सांगितली. (Manipur Imphal 3 girls concocted a story to avoid the punishment of bunking class)

या मुलींनी पोलिसांना सांगितले की, अपहरणकर्त्यांनी त्यांना पिकनिकला नेण्याची ऑफर दिली आणि व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले. तसंच मुलींनी सांगितलं की, अपहरणकर्त्यांनी मास्क घातले होतं. तसंच, थोड्याच वेळात त्यांना संशय आला आणि या मुलींनी गाडीतून उडी मारली, असा अपहरणाची बनाव कथा रचत या मुलींनी पोलिसांना सांगितली.

- Advertisement -

या माहितीने मणिपूर प्रशासनात खळबळ उडाली होती. आधीच मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराने गेल्या काही महिन्यांत जवळपास 170 जणांचा बळी घेतला आहे. विशेष विधानसभा अधिवेशनाच्या एक दिवस आधी ही कथित घटना घडल्याने तणावात आणखी भर पडली.

मात्र, शालेय विद्यार्थिनींच्या चौकशीत पोलिसांना त्यांच्या जबाबात तफावत आढळून आली. पोलीस सूत्रांनी सांगितले की, योग्य तपास करण्यात आला आणि शेवटी हे सिद्ध झाले की या मुलींनी शाळेला दांडी मारली होती आणि शिक्षेपासून वाचण्यासाठी त्यांनी अपहरण झाल्याची कथा रचली. आता या मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मणिपूरमध्ये हिंसचार अद्याप कायम 

- Advertisement -

मणिपूर हिंसाचारावरून देशातील राजकारण पेटलेलं आहे. विरोधकांनी तर सत्ताधारी भाजपविरोधात अविश्वास प्रस्तावही आणला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही खुलासा करण्यासाठी भाग पाडण्यात आलं होतं. मात्र, मणिपूरमध्ये दोन समुदायांमध्ये सुरू असलेला हा दंगा अद्याप काही पूर्णपणे थांबवलेला नाही. आतापर्यंत या हिंसाचारात 170 जणांचा बळी गेला आहे.

(हेही वाचा: मध्यप्रदेशमधील दलित अत्याचारांच्या घटनांमुळे भाजपचं वाढलं टेन्शन; दलित व्होटबँक कमी होण्याची शक्यता?)

- Advertisment -