घरताज्या घडामोडीमणिपूर भूस्खलनात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू, बेपत्ता जवानांसाठी शोधमोहीम सुरूच

मणिपूर भूस्खलनात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू, बेपत्ता जवानांसाठी शोधमोहीम सुरूच

Subscribe

अडकलेल्यांसाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून खराब हवामान आणि सातत्याने भूस्खलन सुरू असल्याने मदतकार्यात अडथळे येत असल्याचं सांगण्यात येतंय.

मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत सात जवानांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अडकलेल्यांसाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून खराब हवामान आणि सातत्याने भूस्खलन सुरू असल्याने मदतकार्यात अडथळे येत असल्याचं सांगण्यात येतंय. (Manipur landslide kills 14, search for missing continues)

हेही वाचा व्यावसायिक सिलिंडर महिन्याभरात ३०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर

- Advertisement -

मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील इम्फाळ-जिरिबाम रेल्वे मार्गाजवळ TA च्या 107 तुकड्यांना तैनात करण्यात आलं होतं. यावेळी भूस्खळन झालं. भूस्खलन झाल्यानंतर भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सकडून तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. रेल्वेच्या साइट इंजिनिअरिंग प्लांटमधून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

हेही वाचा – जम्मू-काश्मीरमध्ये जी २० देशांची बैठक घेण्यास चीनचा विरोध

- Advertisement -

डीजीपी पी डोंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 लोकांना बाहेर काढण्यात आले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित लोकांचा शोध सुरू आहे. लष्कराचे जवान, रेल्वे कर्मचारी, स्थानिक लोक आणि मजुरांसह सुमारे ६० जण अडकल्याची भीती आहे. काल दिवसभर चाललेल्या ऑपरेशननंतर 7 लष्करी जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले तर 13 जवानांची सुखरूप सुटका करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अजूनही मोठ्या संख्येने जवान बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध सुरू आहे. छावणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तसेच, खराब हवामानामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. जखमींवर मेडिकल युनिटमध्ये उपचार असून गंभीर जखमी जवानांना इम्फाळ येथे हलवण्यात आले आहे.

हेही वाचा – केंद्र सरकारकडून ट्विटर इंडियाला शेवटचा अल्टिमेटम, नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा

दरम्यान, वातावरण खराब असल्यामुळे बचावकार्य करण्यास अडचणी येत आहेत. या खराब हवामानातही बेपत्ता जवानांसाठी शोधमोहिम सुरू आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -