घरAssembly Battle 2022Manipur Elections: मणिपूरच्या 'या' 10 दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोणाला किती मते...

Manipur Elections: मणिपूरच्या ‘या’ 10 दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोणाला किती मते मिळाली? वाचा

Subscribe

मणिपूरमधील मतमोजणीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. भाजप सुरुवातीपासून आघाडीवर आहे, तर काँग्रेस पिछाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी एक्झिट पोलने मणिपूरमध्ये भाजपच्या युक्तीचे सरकार पुन्हा येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. त्याप्रमाणेच मणिपूरमधील चित्र दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये नेत्यांबाबत सर्व पक्षांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये अनेक नवे चेहरे समोर आले आहेत. मणिपूरमध्ये एकूण विधानसभेच्या 60 जागा आहेत आणि भाजपच्या युक्तीचे सरकार आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हिंगांगमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. एकूण 256 उमेदवार निवडणूक लढत आहेत. यामधील 10 दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ते कोणते आणि आतापर्यंत त्यांना किती मत मिळाली? वाचा

  • मुख्यमंत्री एन बिरेन सिंग – पक्ष – भाजप, मतदारसंघ – हिंगांग, मत – 24,268
  • विधानसभाचे अध्यक्ष वाय. खेमचंद टीएच. विश्वजीत – पक्ष – भाजप, मतदारसंघ – सिंगजामी (singjamei), मत – 275
  • टीएच राधेश्याम – पक्ष – भाजप, मतदारसंघ – हिरोक (Heirok), मत – 12,989
  • निमचा किपगेन (Nemcha Kipgen) – पक्ष – भाजप, मतदारसंघ – Kangpokpi, मत – 14,284
  • माजी मुख्यमंत्री ओ आयबोबी (Okram Ibobi Singh) – पक्ष – काँग्रेस, मतदारसंघ – थौबल (Thoubal), मत – 14,324
  • एन. लोकेन सिंह – पक्ष – काँग्रेस, मतदारसंघ – नंबोल (Nambol), मतदारसंघ – 13,276
  • डिंगंगलुंग गंगमेई (Dinganglung Gangmei) – पक्ष – भाजप, मतदारसंघ – नुंगबा (Nungba), मत – 14, 216
  • वाय जॉयकुमार (Yumnam Joykumar Singh) – पक्ष – नॅशनल पिपल्स पार्टी, मतदारसंघ – उरीपोक (Uripok), मत – 7,147
  • उपमुख्यमंत्री एल. जयंत – पक्ष – नॅशनल पिपल्स पार्टी, मतदारसंघ – केशमथोंग (Keishamthong), मत – 5,511
  • खाशिम वाशूम (Khashim vashum) – पक्ष – नागा पिपल्स फ्रंट, मतदारसंघ – चिंगाई (Chingai), मत – 12,746

हेही वाचा – Manipur Elections: मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह 24 हजार मतांनी आघाडीवर, काँग्रेसचे शरतचंद्र सिंह पिछाडीवर


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -