घरदेश-विदेशManipur violence : हिंसाचारानंतर आपल्या घरी परतणाऱ्यांची संख्या मोठी; तिकीट दरात 10...

Manipur violence : हिंसाचारानंतर आपल्या घरी परतणाऱ्यांची संख्या मोठी; तिकीट दरात 10 पटीने वाढ

Subscribe

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये आठवड्याभरापूर्वी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर अजूनही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे मणिपूरमधून आपल्या घरी परतणाऱ्या नागरिकांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे. त्यामुळे विमानतळाला बस स्टँडसारखे स्वरुप आले आहे. याशिवाय विमान भाड्यात 10 पटींनी वाढ झाली आहे.

मणिपूरमधील चुराचांदापूरमध्ये 28 एप्रिलला दोन गटामध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. त्यामुळे या राज्यातून आपल्या घरी जाण्यासाठी नागरिकांनी विमानतळावर गर्दी केली आहे. खासकरून कोलकातामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पण लोकांना इंफान ते कोलकाता असा प्रवास करण्यासाठी 10 पट जास्त तिकीटाला पैसे द्यावे लागत आहेत. या दोन शहरांमधील विमानाचे भाडे साधारणात: 2500 ते 3000 पर्यंत आहे, परंतु नागरिकांना 25000 पर्यंत तिकीटाचे भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे ऐवढा महाग प्रवास करायचा असा प्रश्न नागिरकांना पडला आहे. मणिपूरमध्ये  नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा आहेत. फक्त विमान तिकीट असलेले नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. मणिपूरमधून बाहेर पडणाऱ्या लोकांमुळे विमानतळाला बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनसारखे स्वरुप आले आहे.

- Advertisement -

विमान भाडे कमी होण्याची शक्यता नाही
इंफाळ आणि कोलकाता दरम्यान सर्व उड्डाणे सुरू असल्यामुळे कोलकातामध्ये जाण्यासाठी इंफाळ विमानतळाबाहेर हजारो नागरिक जमा झाले आहेत आणि ते आपल्या विमानाची वाट पाहत असल्याची माहिती विमान कंपन्यांन्याकडून मिळाली आहे. याशिवाय लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त उड्डाणे होत असल्याचे काही कंपन्यांनी सांगितले आहे. पण सध्याच्या परिस्थितीतही विमान भाड्यात 10 पटीने वाढ झाली असली तरी पुढील काही दिवस विमान भाडे कमी होण्याची शक्यता नाही, अशी माहिती ट्रॅव्हल एजंटने दिली आहे.

विमाने फूल असुनही तिकिटांची मागणीत लक्षणीय वाढ
विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, आतापर्यंत इंफाळ विमानतळावरून 108 विमानांनी उड्डाण केले आहे. या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना बाजारभावाने वस्तूंची विक्री करणारे विशेष खाद्य आणि स्नॅक्स काउंटर सुरू करण्यात आले असून प्रवाशांना ते मोफत देण्यात येत आहेत. इंफाळहून सुटणारी सर्व उड्डाणे फूल झाली असली तरी तिकिटांची मागणी लक्षणीय वाढली आहेत, अशी माहिती कोलकाता विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -