नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचारातील आणखी दोन पीडित महिलांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली आहे. या दोन्ही महिलांचा लैंगिक छळ झाल्याचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मणिपूर सरकारला नोटीस बजावली आहे. यातील याचिकाकर्त्या पीडित महिलेच्या आई आणि भावाची हत्याच्या तपास करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढील 13 ऑक्टोबरला होणार आहे.
पीडित महिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत मणिपूरमधील जातीय संघर्षादरम्यान लैंगिक छळ झाल्याचे म्हटले आहे. यानंतर न्यायालयाने मणिपूर सरकाला नोटीस बजावली आहे. या याचिकाकर्त्या महिलांनी एक वेब पोर्टल स्थापन करण्याची मागणी केली आहे. जेणे करून हिंसाचारानंतर मणिपूरमधून पळून गेलेल्या लोकांच्या तक्रारी, एफआयआर कौटुंबिक पेन्शन आणि वैद्यकीय कागदपत्रे येथे अपलोड करू शकतील, अशी मागणी त्यांनी त्यांच्या याचिकेतून न्यायालयाकडे केली आहे.
हेही वाचा – मणिपूर हिंसाचाराची सीबीआय चौकशी करणार मुंबईचे माजी पोलीस कमिशनर
पीडितेच्या डोळ्यासमोर कुटुंबाची हत्या
पीडितांनी त्यांच्या याचिकेत म्हटले की, आई आणि भावाला दुसऱ्या समुदातील जमावाने मारहाण केली असून याचिकाकर्त्यांनी छळ केले आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली. जमावातील काही महिलांनी याचिकाकर्त्यांच्या एका वर्षाच्या मुलाला मारहाण केली होती. या हिंसाचारात पीडितेच्या हाताला फ्रॅक्चर आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. जमावाने कपडे फाडले आणि पीडितेची जबरस्तीने परेड करण्यास भाग पाडले.
हेही वाचा – मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदी बोलत नसल्याने विरोधकांचा वॉकआऊट; राष्ट्रवादीचा एकच खासदार सभागृहात