घरदेश-विदेशभगतसिंगांचं नाव घेत मनीष सिसोदिया सीबीआय चौकशीला हजर; म्हणाले, तुरुंगात जावं...

भगतसिंगांचं नाव घेत मनीष सिसोदिया सीबीआय चौकशीला हजर; म्हणाले, तुरुंगात जावं…

Subscribe

Manish Sisodiya CBI Inquiry | मद्य विक्री धोरण घोटाळाप्रकरणी चौकशीला सामोरे जाण्याआधी त्यांनी ट्वीट केलं होतं. त्यानुसार मला अटक झाली तरी मी अटकेसाठी तयार आहे, असं ते म्हणाले.

Manish Sisodiya CBI Inquiry | नवी दिल्ली – नव्या मद्यविक्री धोरण प्रकरणी (Delhi Liquor Policy scam) दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (DCM Manish Sisodia) यांची सीबीआय चौकशी (CBI Inquiry ) लागली असून आज ते सीबीआय कार्यालयात हजर राहिले आहेत. सीबीआय कार्यालयात जाण्याआधी ते आज राजघाट येथे गेले होते. त्यांच्यासोबत आपचे राज्यसभा खासदार संजय सिंगसुद्धा उपस्थित होते. मद्यविक्री धोरण घोटाळाप्रकरणी चौकशीला सामोरे जाण्याआधी त्यांनी ट्वीट केलं होतं. त्यानुसार, मला अटक झाली तरी मी अटकेसाठी तयार आहे, असं ते म्हणाले.

मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करत म्हटलं की, “आज मी पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. सीबीआयच्या तपासकार्यात मी त्यांना मदत करणार आहे. लाखो विद्यार्थ्यांचं प्रेम आणि कोट्यवधी देशवासियांचे आशिर्वाद माझ्यासोबत आहे. काही महिने मला तुरुंगात राहावं लागलं तरी मला त्याची तमा नाही. भगतसिंग यांचा मी अनुयायी आहे. देशासाठी भगतसिंह फाशीवर चढले होते. अशा खोट्या आरोपांमुळे मला तुरुंगात जावं लागणं ही लहान बाब आहे.”

- Advertisement -


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांचं हेच ट्वीट रिट्वीट करत तुरुंगात जायला लागल्यास ते भूषण असेल असं म्हणाले आहेत. “देव तुमच्यासोबत आहे मनीष. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे आशीर्वाद सोबत आहेत. जेव्हा तुम्ही देश आणि समाजासाठई तुरुंगात जाता तेव्हा ते दुषण नसून भूषण असतं. तुम्ही लवकरच परताल अशी देवाकडे प्रार्थना करतो. दिल्लीतील विद्यार्थी, पालक आणि आम्ही सगळे तुमच्या प्रतीक्षेत आहोत. ज्या देशात गरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणारे आणि त्या विद्यार्थ्यांचं भविष्य बनवणारे तुरुंगात जातात आणि कोट्यवधींचा घोटाळा करणारे पंतप्रधानांचे मित्र बनतात, तो देश काय प्रगती करू शकतो?” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.


यापूर्वी १९ फेब्रुवारीला मनीष सिसोदिया सीबीआयच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार होते. मात्र त्यांनी दिल्लीच्या अर्थसंकल्पाचे कारण देत तारीख वाढवून मागितली होती. तसंच, या तपासात पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी मान्य केलं होतं. सीबीआय चौकशीनंतर मनीष सिसोदिया यांना आज अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

नव्या मद्यविक्री धोरणप्रकरणी गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरला सीबीआयने सात जणांविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यात सिसोदिया यांचे नाव आरोपी म्हणून नव्हते. त्यामुळे सीबीआयने याप्रकरणी तपास करत त्यांचे पैशांचे व्यवहार, मद्यव्यापारी आणि आपनेते यांची माहिती गोळा केली. प्राप्त झालेल्या माहितीबाबत सीबीआय आज सिसोदिया यांच्याकडून स्पष्टीकरण घेणार आहे.

हेही वाचा मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ; हेरगिरीप्रकरणात खटला चालवण्यास केंद्राची मंजुरी

सिसोदिया आणि इतरांवर राजधानीत नवीन मद्य विक्री धोरण आणण्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी गेल्या वर्षी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर, दिल्ली सरकार जुन्या मद्य धोरणाकडे वळले आणि कोट्यवधी रुपयांच्या महसुलाच्या नुकसानासाठी लेफ्टनंट गव्हर्नरला जबाबदार धरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -