घर देश-विदेश Manish Sisodia : दिल्ली HC जामीन फेटाळताना म्हणाले, 'तुम्ही तर ताकदवान'

Manish Sisodia : दिल्ली HC जामीन फेटाळताना म्हणाले, ‘तुम्ही तर ताकदवान’

Subscribe

 

नवी दिल्लीः  तुम्ही ताकदवान आहात. साक्षीदारांना प्रलोभन दाखवू शकता, असे निरीक्षण नोंदवत दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री Manish Sisodia यांचा जामीन अर्ज The Delhi High Court ने मंगळवारी फेटाळून लावला.

- Advertisement -

न्या. दिनेश कुमार शर्मा यांनी उपमुख्यमंत्री Manish Sisodia यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. Manish Sisodia यांच्याविरोधात गंभीर आरोप आहेत. ते लोकसेवक आहेत. त्यांच्यावर आरोप असलेली Delhi excise policy आम्ही तपासलेली नाही. राज्य शासनाला काय अधिकार आहेत याचीही चाचपणी आम्ही केली नाही. मात्र Manish Sisodia हे ताकदवान आहेत. ते साक्षीदारांना प्रलोभन दाखवू शकतात, असे नमूद करत Delhi High Court ने Manish Sisodia यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

याआधी दिल्ली विशेष न्यायालयाने Manish Sisodia यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. Manish Sisodia हे या प्रकरणातील गुन्हेगारी कटाचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी सुमारे 90-100 कोटी रुपयांची आगाऊ लाच देण्याच्या गुन्हेगारी कटात सर्वात महत्त्वाची आणि प्रमुख भूमिका बजावली आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्याविरोधात Manish Sisodia यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती.

- Advertisement -

हेही वाचाः सत्येंद्र जैन तुरुंगात चक्कर येऊन पडले; सर्वोच्च न्यायालयाने दिला सशर्त जामीन

नेमके काय आहे प्रकरण

Delhi excise policy संबंधित केसच्या चौकशीसाठी सीबीआयने Manish Sisodia यांना बोलावले होते. जवळपास आठ तास त्यांची चौकशी करण्यात आली. हे प्रकरण 2021 मध्ये सादर केलेल्या New Delhi excise policy  संबंधित आहे. केजरीवाल सरकारने 2021 मध्ये excise policy तयार केले होती.  त्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यासंबंधी वाद वाढल्यानंतर ते धोरण रद्दही करण्यात आले होते. दिल्ली सरकारने या धोरणातून उत्पन्नात लक्षणीय अशी 27 टक्के महसूल वाढ नोंदवली. सुमारे 8,900 कोटींचे उत्पन्न दिल्ली सरकारला मिळाले होते. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणि दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी या प्रकरणात गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला. या धोरणाविरोधात नायब राज्यपालांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. गेल्या वर्षी सीबीआयने मनिष सिसोदिया यांच्या घरासह 31 ठिकाणी छापे टाकले होते.

सीबीआयचा दावा

Excise Policy मध्ये बदल करण्यासाठी Manish Sisodia यांनी सचिवाला नवीन कॅबिनेट नोट तयार करण्यास सांगितले होते. नफ्याची टक्केवारी ५ टक्क्यावरून १२ टक्के करण्यात आली. हा बदल का करण्यात आला याचे उत्तर Sisodia यांना देता आले नाही, असा दावा सीबीआयने केला.

अटकेनंतर मंत्रिपदाचा राजीनामा

Manish Sisodia व आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी एकाच दिवशी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे मंजूर केले. Sisodia यांच्याकडे १८ खाती होती. विशेष म्हणजे सत्येंद्र जैन यांना अटक झाल्यानंतर त्यांच्याकडील आरोग्यमंत्री पदही Sisodia यांच्याकडे सोपवण्यात आले होते. सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या वर्षी ३० मे रोजी अटक करण्यात आली.  हवाला प्रकरणी ईडीने त्यांच्यावर ही कारवाई केली. कोलकाता येथील बेनामी कंपन्यांमधील हवाला गुंतवणूक प्रकरणी त्यांना अटक झाली. ते सध्या तिहार कारागृहात आहेत. त्यांना कारागृहात व्हीआयपी सवलती मिळत असल्याचा आरोपही झाला होता. आरोग्यमंत्री जैन यांच्यावरील आरोप मुख्यमंत्री केजरीवाल यांनी फेटाळून लावले होते. उपचारासाठी विशेष न्यायालयाने जैन यांना जामीन मंजूर केला आहे.

 

 

 

- Advertisment -