Homeताज्या घडामोडीDr. Manmohan Singh : मी मार्गदर्शक गमावला; डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर...

Dr. Manmohan Singh : मी मार्गदर्शक गमावला; डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावूक

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. वयाच्या 92 वर्षी मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. डॉ. मनमोहन सिंग म्हणजे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ ज्यांनी उदारीकरणाच्या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकट केले. परंतु, त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण भारतावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. राजकारण्यांसह सर्वस्तरावरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. नुकताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. वयाच्या 92 वर्षी मनमोहन सिंग यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. डॉ. मनमोहन सिंग म्हणजे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ ज्यांनी उदारीकरणाच्या निर्णयाने भारताच्या अर्थव्यवस्थेला बळकट केले. परंतु, त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण भारतावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. राजकारण्यांसह सर्वस्तरावरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. नुकताच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरील एक्सवरर पोस्ट करत डॉ. मनमोहन सिंग यांना राहुल गांधी श्रद्धांजली वाहिली आहे. “डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे मी माझा मार्गदर्शक गमावला आहे. आपल्यासारखे अनेकजण आहेत, जे त्यांना अभिमानाने आपल्या स्मरणात ठेवतील, असे राहुल गांधी यांनी लिहिले आहे. (Manmohan Singh congress leader Rahul Gandhi expressed grief over the death of Manmohan Singh)

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

“डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे मी माझा मार्गदर्शक गमावला आहे. आपल्यासारखे अनेकजण आहेत, जे त्यांना अभिमानाने आपल्या स्मरणात ठेवतील. मनमोहन सिंग यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि समजूतदारपणा दाखवत भारताचे नेतृत्व केले. त्यांना आर्थिकशास्त्राबाबत असलेल्या ज्ञानामुळे भारताला मोठी प्रेरणा मिळाली. मी त्यांच्या पत्नी कौर आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो”, असे राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

- Advertisement -

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शासकीय कामं रद्द करण्यात आली आहेत. शिवाय, कर्नाटकातील बेळगावी येथे होणारी काँग्रेस कमिटीची बैठक काँग्रेसने रद्द केली आहे. याबाबत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी माहिती दिली.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली असा परिवार आहे. साहित्य, संगीत आणि अध्यात्मात त्यांना प्रचंड रस होता. मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशभरात शोककळा पसरली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच शनिवार 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते 11 वाजताच्या सुमारास दिल्लीतील शक्तीस्थळाजवळ विशेष प्रोटोकॉलसह अंत्यसंस्कार होणार आहेत. सध्या डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Dr. Manmohan Singh : उपेक्षित आणि मुस्लिमांच्या उत्थानासाठी काम करणारे पहिले पंतप्रधान, ओवैसींकडून श्रद्धांजली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -