घरताज्या घडामोडीमनमोहन सिंह यांच्या आरोग्याबाबत AIIMS ने दिली माहिती

मनमोहन सिंह यांच्या आरोग्याबाबत AIIMS ने दिली माहिती

Subscribe

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने दिली आहे. आरोग्याच्या कारणामुळे ८९ वर्षीय मनमोहन सिंह यांना दिल्लीत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना ताप येत असल्याने उपचारासाठी दाखल केल्याचे एम्सने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. मंगळवारपासूनच त्यांना ताप येत होता. म्हणूनच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाअंतर्गत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Manmohan Singh health update announced by AIIMS )

मनमोहन सिंह यांच्या तब्येतीत अत्यंत वेगाने सुधारणा होत असून त्यांच्या आरोग्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असे ट्विट केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी केले आहे. कॉंग्रेसनेही मनमोहन सिंह यांच्या आरोग्यासाठी ट्विटर हॅण्डलवरून शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या वर्षीही त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. याच वर्षात एप्रिल महिन्यात मनमोहन सिंह यांना कोरोनाच्या उपचारासाठी एप्रिलमध्ये एम्सममध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनावर उपचार घेऊन त्यांनी या व्हायरसवर मात केली होती. नुकताच त्यांनी २६ सप्टेंबरला आपला वाढदिवस साजरा केला.

- Advertisement -

मनमोहन सिंह यांना भारताच्या पंतप्रधानपदी राहण्याची संधी दोनवेळा मिळाली आहे. ब्रिटिश राजवटीत पाकिस्तानातील ताब्यातील पंजाबमध्ये गाह याठिकाणी त्यांचा जन्म हा २६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. मनमोहन सिंह यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्वाच्या पदावर काम केले आहे. १९८२ ते १९८५ या काळात ते रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते. १९८५ ते १९८७ या काळात त्यांनी प्लॅनिंग कमिशनचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. तर १९९१ मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी ग्रॅंट कमिशन (UGC) चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. मनमोहन सिंह यांचा कार्यकाळ हा २०१४ मध्ये संपुष्टात आला. भाजपच्या विजयानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील सरकार आले. मोदींना विजयाच्या शुभेच्छा सर्वात आधी देणारी व्यक्ती ही मनमोहन सिंह होती.

- Advertisement -

हेही वाचा – Covid-19 उगमस्थान शोधाची शेवटची संधी, WHO च्या SAGO पॅनेलला जगभरातून ७०० वैज्ञानिकांचे अर्ज

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -