Homeताज्या घडामोडीDr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांना...

Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांना झेड प्लस सुरक्षा

Subscribe

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सन्मानाने निरोप देण्यात आला. दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डॉ.सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर आणि त्यांच्या मुली उपस्थित होत्या.

मुंबई : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सन्मानाने निरोप देण्यात आला. दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डॉ.सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर आणि त्यांच्या मुली उपस्थित होत्या. 2019 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचे SPG सुरक्षा कवच काढून घेण्यात आले. एसपीजीच्या जागी त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. आता त्यांची पत्नी गुरुशरण कौर यांनाही सीआरपीएफ झेड प्लस सुरक्षा मिळणार आहे. (Manmohan Singh wife Gursharan Kaur will be under Z Plus security will get BP BMW)

या सुरक्षा वर्तुळात त्यांच्याकडे बुलेटप्रूफ वाहनही असणार आहे. त्यांच्या निवासस्थानी सुमारे चार डझन सैनिक उपस्थित राहणार आहेत. जेव्हा डॉ. मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा काढून त्यांना सीआरपीएफने झेड प्लस सुरक्षा दिली होती, तेव्हा त्यांना एसपीजी असलेली तीच उच्च श्रेणीची बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू कार देण्यात आली होती ज्यामध्ये ते प्रवास करायचे. आता त्यांची पत्नी गुरुशरण कौर यांच्याकडेही हीच कार असेल, अशी माहिती समोर येत आहे.

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री उशिरा वयाच्या 92 व्या वर्षी एम्समध्ये निधन झाले. पंतप्रधानपद सोडल्यानंतर डॉ. सिंग यांना मोतीलाल नेहरू रोडवर असलेला बंगला क्रमांक 3 देण्यात आला. पाच वर्षांपूर्वी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) संदर्भात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू झाला होता. कारण 2019 मध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा काढून घेण्यात आली होती. काही महिन्यांनंतर ज्यावेळी गांधी कुटुंबातील सदस्यांची एसपीजी सुरक्षा हटवण्यात आली, त्यावेळी विरोधकांनी केंद्र सरकारवर एसपीजी सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, 2004 ते 2013 पर्यंत गांधी कुटुंबाच्या SPG सुरक्षेवर अंदाजित 1800 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. 2019 मध्ये SPG दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. त्यावेळी दुरुस्त विधेयकानुसार, एसपीजी सुरक्षा केवळ पंतप्रधान आणि त्यांच्या निवासस्थानी राहणाऱ्यांनाच उपलब्ध असेल. माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाला सरकारने दिलेल्या निवासस्थानात 5 वर्षांसाठी SPG संरक्षण राहिल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते.

1985 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या आधारे SPG ची स्थापना करण्यात आली. 1985-88 पासून, एसपीजी कार्यकारी आदेशानुसार कार्यरत होते. 1988 मध्ये SPG साठी कायदा करण्यात आला. त्यानंतर 1991, 94, 99 आणि 2003 मध्ये SPG सुरक्षा कायद्यात सुधारणा करण्यात आली.


हेही वाचा – Suresh Dhas in Beed : पंकूताईंना चांगली माणसे जमत नाही, सुरेश धस यांचा मुंडे भावा-बहिणीवर हल्लाबोल