घरदेश-विदेशMann Ki Baat: सरत्या वर्षानं आपल्याला खूप काही दाखवलं आणि शिकवलं- पंतप्रधान...

Mann Ki Baat: सरत्या वर्षानं आपल्याला खूप काही दाखवलं आणि शिकवलं- पंतप्रधान मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २७ डिसेंबर रोजी या वर्षातील शेवटच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह त्यांनी नवीन वर्षात २०२१ मध्ये भारत यशाच्या नव्या शिखरावर असेल आणि जगात भारताची ओळख आणखी मजबूत राष्ट्र म्हणून होईल, अशी अपेक्षा आपण करुयात असा संदेश दिला. २०२० या वर्षाने आपल्याला खूप काही दाखवलं आहे तसंच शिकवलं आहे, असेही मोदी म्हणाले. यासह मोदी यांनी देशभरातून नागरिकांनी पाठवलेल्या पत्रांचा उल्लेख करत जनता कर्फ्यू, करोना, आत्मनिर्भर भारत, व्होकल फॉर लोकल यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भारतात तयार होणाऱ्या वस्तू जागतिक दर्जाच्या असाव्यात असं म्हणत उद्योगपतींनी पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांना नव्या वर्षानिमित्त संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान मोदींनी आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत ‘व्होकल फॉर लोकल’वर जोर दिला. मोदी म्हणाले,”व्होकल फॉर लोकलची भावना देशातील नागरिकांनी दृढ करण्याची गरज आहे. हे आपल्याला वाढवत राहायचं आहे. प्रत्येकजण नव्या वर्षात काही संकल्प करतो. यावेळी देशासाठी हा एक संकल्प आवश्यक करावा. मी आधीही बोललो आहे. मी पुन्हा एकदा आग्रह करतो की, आपण एक यादी बनवावी. दिवसभर आपण ज्या गोष्टी घेतो. त्यामध्ये नकळतपणे विदेशात तयार होणाऱ्या वस्तू तर घेत नाही ना? यासाठी त्या वस्तूची भारतात तयार झालेल्या पर्यायी वस्तूची माहिती घ्या. ती वस्तू भारतात तयार होईल, यासाठी प्रयत्न करा,” असे आवाहन मोदी यांनी केले आहे.

- Advertisement -

“देशाच्या सन्मानार्थ सामान्य माणसांमध्ये झालेले बदल आपण अनुभवले आहेत. मी देशात आशेचा एक अद्भुत प्रवाहही बघितला आहे. असंख्य आव्हानं होती, संकटं पण आले. कोरोनामुळे जगभरात पुरवठा साखळीत अनेक समस्या आल्या. पण भारताने प्रत्येक संकटात नवीन गोष्टी आत्मसात केल्या,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच आपण #AatmaNirbharBharat ला पाठिंबा देत आहोत, पण आमच्या उत्पादकांनीही ते तयार करत असलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये ही गोष्ट तर अगदी बरोबर आहे. Zero effect, zero defect या कल्पनेसह काम करण्याची ही योग्य वेळ आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदींनी सांगितले की, आता मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला अभिमान देखील वाटेल. २०१७-२०१८ दरम्यान भारतातील बिबट्यांची संख्या ६० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. २०१४ मध्ये देशात बिबट्यांची संख्या सुमारे ७ हजार ९०० होती, तर २०१९ मध्ये ही संख्या वाढून १२ हजार ८५२ झाली. “देशातील बऱ्याच राज्यांत, विशेषत: मध्य भारतात, बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र अव्वल स्थानी आहेत. ही एक मोठी कामगिरी आहे, असे मोदी म्हणाले.

- Advertisement -

‘नव्या वर्षात कोणती फळं मिळतील भरवसा नाही’; राऊतांनी केलं केंद्राला लक्ष्य!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -