Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Mann ki Baat : 'मी मंकी बात कधीही ऐकलेली नाही', PGIMERच्या वादावर...

Mann ki Baat : ‘मी मंकी बात कधीही ऐकलेली नाही’, PGIMERच्या वादावर महुआ मोइत्रांचं वादग्रस्त ट्विट

Subscribe

मी मंकी बात कधीही ऐकलेली नाही. एकदाही नाही. कधी ऐकणारही नाही. मलाही शिक्षा होणार आहे का? मला एका आठवड्यासाठी घर सोडण्यास मनाई असेल का? असं महुआ मोइत्रा म्हणाल्या.

Mahua Moitra Monkey Baat Tweet: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ च्या 100 व्या भागाला उपस्थित न राहिल्याबद्दल 36 नर्सिंग विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी याबाबत वादग्रस्त ट्विट केले आहे. त्यांनी मन की बातला मंकी बात म्हटले आहे. ( Mann ki Baat I have never heard of Monkey Baat Mahua Moitra s controversial tweet on PGIMER controversy Pm Narendra Modi )

ट्विट करत म्हणाल्या की, मी मंकी बात कधीही ऐकलेली नाही. एकदाही नाही. कधी ऐकणारही नाही. मलाही शिक्षा होणार आहे का? मला एका आठवड्यासाठी घर सोडण्यास मनाई असेल का? असं त्या यावेळी म्हणाल्या. खरं तर, चंदिगडमधील पीजीआयएमईआर प्रशासनाने 36 नर्सिंग विद्यार्थ्यांना पीएम मोदींच्या मन की बातच्या 100 व्या एपिसोडला उपस्थित राहण्यासाठी वसतिगृह सोडण्यास बंदी घातली होती.

- Advertisement -

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन (NINE) च्या सर्व नर्सिंग विद्यार्थ्यांनी कॅम्पस इव्हेंटमध्ये भाग घ्यावा असा PGIMER अधिकाऱ्यांनी लेखी आदेश जारी केला होता. मन की बात ३० एप्रिलला प्रसारित करण्यात आली होती.

PGIMER ने गुरुवारी (11 मे) जारी केलेल्या निवेदनात, त्यांनी आपल्या निर्णयाचा बचाव केला. संस्थेने सांगितले की हे नियमित अभ्यासक्रमाच्या क्रियाकलापांचा एक भाग म्हणून केले गेले होते ज्यात तज्ज्ञ आणि व्यावसायिकांना अतिथी व्याख्यान आणि चर्चेसाठी आमंत्रित केले होते.

- Advertisement -

( हेही वाचा: मुंबई तापणार; राज्यातील ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा )

नेमकं प्रकरण काय?

30 एप्रिल रोजी चंदीगढमधील पीजीआयच्या इन्स्टिट्यूटच्या एलटी-1 सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात 100 वा भाग ऐकण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना होत्या. मात्र, प्रथम वर्षाला शिकणाऱ्या 28 आणि तृतीय वर्षीला शिकणाऱ्या 8 अशा एकू 36 विद्यार्थिनी या कार्यक्रमाला अनुपस्थित होत्या. त्यामुळे त्यांना एका आठवड्यासाठी स्थानबद्ध करण्याची शिक्षा सुनावण्यात आली.

( हेही वाचा: CBSE Board : दहावी- बारावी निकाल जाहीर; ‘इथे’ क्लिक करून पाहा )

- Advertisment -