घरताज्या घडामोडीMaan ki Baat: सोफी, विदा आणि बीडचा रॉकी, श्वानांबद्दल मोदींची मन की...

Maan ki Baat: सोफी, विदा आणि बीडचा रॉकी, श्वानांबद्दल मोदींची मन की बात

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणारा मन की बात हा कार्यक्रम भारतीयांसाठी खास असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी नवीन विषय भारतीयांसमोर मांडतात. आजच्या कार्यक्रमात मोदीजींनी अनेक विषयावर भाष्य केले. मात्र त्यांनी केलेल्या श्वानांबद्दलच्या भाष्यावर अनेक लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. कुत्रे पाळताना भारतीय प्रजाती पाळाव्यात, अशी माहिती देताना मोदी यांनी भारतीय श्वानांचे पराक्रम कथन केले. तसेच काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याच्या पोलीस दलातील श्वान रॉकीचे निधन झाले होते. त्याचाही उल्लेख मोदींनी केला. तसेच महाराष्ट्रातील मुधोळ हाऊंड या जातीचाही उल्लेख करत या श्वानाची प्रशंसा केली.

मोदींनी सांगितले की, “आपल्या सेनेमध्ये सुरक्षा दलाकडे अनेक पराक्रमी श्वान आहेत. जे देशासाठी आपले योगदान आणि बलिदान देतात. अनेक बॉम्ब हल्ल्यात आणि दहशतवादी चकमकी दरम्यान हे श्वान महत्त्वाची भूमिका बजावतात. काही दिवसांपूर्वी मला सुरक्षा दलातील श्वानांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. भारतीय लष्करातील सोफी आणि विदा या श्वानांना चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंमेडेशन कार्डस या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.”, अशी माहिती त्यांनी दिली.

- Advertisement -

बीडच्या रॉकीचा उल्लेख करताना भावूक

“काही दिवसांपूर्वी तुम्ही टीव्हीवर एक भावुक बातमी पाहिली असेल. बीड पोलीस दलातील रॉकी या श्वान सहकाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याला मोठ्या सन्मानाने निरोप दिला गेला. रॉकीने ३०० पेक्षाही जास्त प्रकरणांची सोडवणूक करण्यात पोलिसांना मदत केली होती.” असा उल्लेख मोदी यांनी केला.

भारतीय श्वानांच्या जाती पराक्रमी

मोदी पुढे म्हणाले की, बचाव कार्य करताना श्वानांची महत्त्वाची भूमिका असते. एनडीआरएफने अशा अनेक श्वानांना प्रशिक्षित केले आहे. भूकंप, इमारत दुर्घटनेत डेब्रिजखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी श्वानांची मदत होते. मला सांगितले गेले की, या कामात भारतीय श्वानाच्या जाती चांगल्या आहेत. त्यामध्ये मुधोळ हाऊंड, हिमालयीन हाऊंड या जाती खूप चांगल्या आहेत. त्यांच्या पालनपोषणाचा खर्चही कमी असतो. आपल्या सुरक्षा दलांनी भारतीय वंशाच्या जातींना सुरक्षा पथकामध्ये समाविष्य करण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisement -

मुधोळ हाऊंड प्रजातीबद्दल

मोदींनी उल्लेख केलेली मुधोळ हाऊंड ही श्वानाची जात महाराष्ट्र आणि कर्नाटक परिसरात आढळते. कर्नाटकमधील मुधोळ या गावावरुन या श्वानाचे नाव मुधोळ हाऊंड ठेवण्यात आलेले आहे. हे श्वान शिकारीसाठी प्रसिद्ध आहेत. मुधोळ हाऊंड अतिशय चपळ असून ते वेगाने धावू शकतात. त्यांची तीक्ष्ण नजर आणि वास ओळखण्याच्या चांगल्या क्षमतेमुळे त्यांना सुरक्षा दलात स्थान देण्यात आलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -