घरदेश-विदेशखरेदी करताना 'व्होकल फॉर लोकल' संदेश लक्षात ठेवा - पंतप्रधान मोदी

खरेदी करताना ‘व्होकल फॉर लोकल’ संदेश लक्षात ठेवा – पंतप्रधान मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशाला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. दसरा हा केवळ असत्यावर विजय मिळवण्याचा उत्सव नसून संकटावर विजय मिळवण्याचा सण आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी ‘व्होकल फॉर लोकल’ ची देखील आठवण करुन दिली.

सणांचा हंगाम येत आहे. यावेळी लोक खरेदीसाठी जातील. खरेदी करताना ‘व्होकल फॉर लोकल’ संदेश लक्षात ठेवा. स्थानिक आणि देशी वस्तू खरेदी केल्या पाहिजेत, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मधून देशाच्या सैनिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना दिवाळीत एक दिवा सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी लावा, असं आवाहन केलं.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “आम्हाला आपल्या शूर सैनिकांचे देखील स्मरण करावे लागेल, जे या उत्सवांच्या वेळी, सीमेवर उभे राहून, भारतमातेची सेवा आणि संरक्षण करतात. देशाच्या शूर जवानांच्या सन्मानार्थ दिवा लावा. मी माझ्या शूर सैनिकांना हे देखील सांगू इच्छितो की आपण सीमेवर असलात तरी संपूर्ण देश आपल्यासोबत आहे. आज ज्यांची मुलं-मुली सीमेवर आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या बलिदानास मी सलाम करतो.”

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ मध्ये खादीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की खादी आमच्या साधेपणाचे वैशिष्ट्य आहे, परंतु आपली खादी आज पर्यावरणपूरक फॅब्रिक म्हणून ओळखली जात आहे. पंतप्रधानांनी मेक्सिकोतील ओहाका शहराचा उल्लेख केला आणि सांगितले की तेथील खादी ओहका खादी म्हणून प्रसिद्ध आहे. पंतप्रधान म्हणाले की ओहाका येथील एक तरुण, मार्क ब्राऊन, गांधीजींच्या कार्याने इतका प्रभावित झाला की त्याने मेक्सिकोला जाऊन खादीचे काम सुरू केले.

- Advertisement -

हेही वाचा – CAA चा देशातील कुठल्याही नागरिकाला धोका नाही – सरसंघचालक मोहन भागवत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -