घरदेश-विदेशहिंदी भाषिक पट्टा पुन्हा भाजपच्या बाजूने उभा

हिंदी भाषिक पट्टा पुन्हा भाजपच्या बाजूने उभा

Subscribe

सकाळी ११ वाजेपर्यंत आलेला निवडणुकीचा कल हा हे स्पष्ट दर्शवतो की, हिंदी भाषिक पट्ट्यात भाजप आणि एनडीएला चांगली आघाडी मिळाली आहे. बिहारमध्ये भाजप ४० पैकी ३८ जागांवर एनडीए आघाडीवर आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए ८० पैकी सुमारे ५० जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजप चांगली कामगिरी करणार नाही, असे म्हटले जात होते. सप, बसप आघाडीला पन्नासपेक्षा जास्त जागा मिळतील, असे सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात सप, बसप आघाडी केवळ २५ जागांवर आघाडीवर आहेत.

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये देखील भाजपने आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेशातील २९ जागांपैकी भाजप २५ जागांवर, गुजरातमधील २६ जागांपैकी २४ जागांवर तर राजस्थानमधील २५ जागांपैकी २३ जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्येही भाजपने आघाडी घेतली असून १४ पैकी १२ जागांवर भाजप आघाडीवर आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, २०१४ प्रमाणे यावर्षी म्हणजे २०१९ साली हिंदी भाषिक पट्टा भाजपच्या बाजूने उभा रहाणार आहे त्यामुळे यावेळी केंद्रातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सत्तेसाठी मार्ग सुकर झालेला आहे. यावेळी सर्वात मोठी मुसंडी भाजपने पश्चिम बंगालमध्ये मारली आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये २०१४ सालच्या निवडणुकीत भाजपला १ जागा मिळाली होती. यावेळी भाजप येथे १४ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने ममता बॅनर्जी यांच्या पायाखालील जमीन सरकली आहे. दुसर्‍या बाजूला आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंना मोठा फटका बसला आहे. महागठबंधनच्या सरकारसाठी आग्रही असलेल्या चंद्राबाबू नायडू यांचे मुख्यमंत्री पद धोक्यात आले आहे. आंध्रप्रदेशात लोकसभा आणि विधान सभा निवडणुका एकत्र झाल्या आहेत. विधान सभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी यांनी मोठी आघाडी घेतली आहे. विधानसभेच्या १७५ जागांपैकी वायएसआर काँग्रेसने १४५ तर चंद्राबाबूंच्या तेलगू देसम पक्षाने अवघ्या २९ जागांवर आघाडी घेतली आहे.तर लोकसभा निवडणुकीतही वायएसआर काँग्रेस ही २५ पैकी तब्बल २४ जागी आघाडीवर आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांच्या प्रयत्नाने केंद्रात महागठबंधनचे सरकार येणार नाही हे जितके खरे तितकेच त्यांचे मुख्यमंत्रीपदही जाणार हेही निश्चित आहे. तामिळनाडूत अण्णाद्रमुक आणि द्रमुक पक्षात काँटे की टक्कर असल्याचे सध्यातरी दिसत असले तरी द्रमुक पक्षाचा वरचष्मा दिसून येणार आहे.

Election Results Nashik Live : उत्तर महाराष्ट्रात ८ पैकी ६ ठिकाणी भाजपची स्पष्ट आगेकूच

- Advertisement -

Maharashtra LokSabha Results : औरंगाबादमध्ये धक्कादायक कल; एमआयएमचे जलील आघाडीवर; खैरे पिछाडीवर

Election Results Mumbai Live : भाजपचे गोपाळ शेट्टी 47 हजार मतांनी आघाडीवर, उर्मिला मातोंडकर पिछाडीवर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -