घरताज्या घडामोडीजम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल मनोज सिन्हा; जीसी मुर्मू यांचा राजीनामा

जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल मनोज सिन्हा; जीसी मुर्मू यांचा राजीनामा

Subscribe

गिरीशचंद्र मुर्मू यांनी बुधवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला

माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मनोज सिन्हा आता जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल असणार आहेत. गिरीशचंद्र मुर्मू यांनी बुधवारी संध्याकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर राष्ट्रपती भवनातर्फे गुरुवारी सकाळी मनोज सिन्हा यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला एक वर्ष पूर्ण झाले असताना, अचानक बुधवारी संध्याकाळी जीसी मुर्मू यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली. यावेळी मुर्मू यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला.

- Advertisement -

दरम्यान, आता नव्या नायब राज्यपाल या पदाची जबाबदारी मनोज सिन्हा यांच्यावर सोपविण्यात आली आहे, यावरून पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या उच्च पदासाठी राजकीय प्रवेश झाल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीर संपूर्ण राज्य असताना सत्यपाल मलिक हे राज्यपाल होते, परंतु केंद्रशासित प्रदेश स्थापन झाल्यावर अधिकारी जी.सी. मुर्मू यांना पाठविण्यात आले. जीसी मुर्मू यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये गणना केली जाते.

मनोज सिन्हा यांच्याबद्दल…

मनोज सिन्हा गाझीपूरचे खासदार होते आणि ते पूर्व उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचा एक मोठा चेहरा आहेत. परंतु त्यांचा २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराजय झाला होता, त्यावेळी हा मोठा धक्का मानला जात होता. मनोज सिन्हा मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री राहिले असून त्यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री आणि संचार राज्यमंत्रीपद होते.


गुजरातमधील कोविड हॉस्पिटलमध्ये भीषण आग; ८ जणांचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -