Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश 'ते' १५०० यात्री अजूनही अडकलेलेच

‘ते’ १५०० यात्री अजूनही अडकलेलेच

कैलास मानसरोवरच्या तीर्थयात्रेला गेलेले १५०० यात्रेकरू नेपाळच्या पर्वतरांगांमध्ये अडकले आहेत. भारताने या यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी नेपाळची मदत मागितली आहे.

Related Story

- Advertisement -

कैलास मानसरोवरच्या तीर्थयात्रेला गेलेले १५०० तीर्थयात्री नेपाळच्या पर्वतरांगांमध्ये अडकले आहेत. कैलास मानसरोवर हे पर्यटकांचे खास आकर्षण असणारे ठिकाण आहे. शिवाय, हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मासाठी हे पवित्र ठिकाण मानले जाते. त्यामुळे दरवर्षी शेकडो भाविक कैलास मानसरोवराच्या तीर्थयात्रेसाठी जात असतात. मात्र, यावर्षी कैलास मानसरोवर यात्रेला निघालेल्या १५०० यात्रेकरुंना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. नेपाळच्या पर्वतरांगांमध्ये अचानक मुसळधार पाऊस आणि वादळ सुरु झाल्यामुळे नेपाळच्या ‘तिब्बत’ जवळील पर्वतरांगांमध्ये यात्रेकरू अडकले आहेत. या पर्वतरांगांमध्ये अडकलेले भारतीय यात्रेकरूंना बाहेर काढण्यासाठी नेपाळची मदत मागण्यात आली आहे.

भारताने नेपाळची मदत मागितली

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज ट्वीट करुन सांगितले की, ‘५२५ ‘सिमिकोट’मध्ये, तर ५५० ‘हिलसा’ आणि ५०० यात्रेकरू ‘तिब्बत’मध्ये अडकले आहेत. भारताने नेपाळला सांगितले आहे की, भारतीय नागरिकांना त्या पर्वतरांगांमधून काढण्यासाठी सेनेच्या हॅलिकॉप्टरचा वापर करावा. भारताने यात्रेकरू आणि त्यांच्या परिवारासाठी हॉटलाइन क्रमांक जाहीर केला आहे. या हॉटलाइन क्रमांकांमार्फत तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्यालम भाषेच्या लोकांना त्यांच्या भाषेत सुचना मिळणार आहेत’.

- Advertisement -


सुषमा स्वराज यांनी सांगितले, ‘नेपाळ येथील भारतीय दूतावासांनी ‘नेपाळगंज’ आणि ‘सिमिकोट’ भागात आपले प्रतिनिधी तैनात केले आहेत. ते यात्रेकरूंच्या संपर्कात आहेत आणि त्यांना अन्नपुरवठा देखील करत आहेत. ‘सिमिकोट’ येथील वयोवृद्ध यात्रेकरूंच्या प्रकृतीची तपासणी केली गेली असून सगळ्या यात्रेकरूंना वैद्यकीय मदत उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘हिलसा’मध्ये पोलीस प्रशासन देखील मदतीला धावत आहे’.

हे आहेत हॉटलाइन नंबर

- Advertisement -

यात्रेकरू आणि त्यांच्या परिवारासाठी भारत सरकारकडून हॉटलाइन नंबर जाहीर करण्यात आले आहेत. तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेच्या यात्रेकरूंसाठी त्यांच्या भाषेतच माहिती देणारा हॉटलाइन नंबर जाहीर करण्यात आला आहे.

प्रणव गणेश (फर्स्ट सेक्रेटरी)  +977-9851107006
ताशी खंपा +977-98511550077
तरुण रहेदा +977 9851107021
राजेश झा +977 9818832398
योगानंद +977 9823672371 (कन्नड)
पिंडी नरेश +977 9808082292 (तेलगू)
आर मुरुगम +977 98085006 (तमिळ)
रंजीत +977 9808500644 (मल्याळम)

- Advertisement -