Homeक्रीडाManu Bhaker : देशासाठी पदक जिंकूनही...; खेलरत्न पुरस्कार यादीतून वगळल्यानंतर मनू भाकरची...

Manu Bhaker : देशासाठी पदक जिंकूनही…; खेलरत्न पुरस्कार यादीतून वगळल्यानंतर मनू भाकरची नाराजी

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय युवा नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये देशासाठी दोन पदके जिंकत इतिहास रचला होता. पण खेलरत्न पुरस्काराच्या यादीतून मनू भाकरचे नाव गायब असल्याचे समोर आले आहे. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. ही बातमी समोर येताच तिच्या कुटुंबाने आणि तिने स्वतः देखील याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. याबद्दल केंद्रात विचारले असता कोणतीही यादी जारी केली नसल्याचे सांगण्यात आले. पण आता या वादामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Manu Bhaker on Khelratn award name missing controversy)

हेही वाचा : Shyam Benegal : हा एका युगाचा अंत…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दिग्दर्शक बेनेगल यांना श्रद्धांजली 

- Advertisement -

देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराकडे पाहिले जाते. यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत आणि पॅराथलीट प्रवीण कुमार यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. पण यासाठी मनू भाकरची शिफारस न केल्याने वाद निर्माण झाला आहे. यावेळी क्रीडा मंत्रालयाने, खेळाडूंना क्रीडा सन्मानासाठी अर्ज भरावा लागतो, तो तिने भरला नसल्याचे सांगितले होते. त्यांचा हा दावा मनू भाकर आणि तिच्या कुटुंबाने खोडून काढला आहे. यावेळी तिच्या वडिलांनी राग व्यक्त केला. “जर तुम्हाला पुरस्कारांसाठी भीक मागावी लागत असेल, तर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकण्यात काय फायदा? एक सरकारी अधिकारी निर्णय घेत असून समितीचे सदस्य गप्प बसून आपले मत देत नाहीत. मला समजत नाही,” असा राग व्यक्त केला.

एका मुलाखतीमध्ये मनू भाकरनेदेखील याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. “मी स्वतः पोर्टलवर अर्ज भरला होता. मला पुरस्कार मिळावा यासाठी माझे नामांकन मी स्वतः केले होते. खेलरत्न हा एक सन्मान आहे. मला दुःख तर वाटले की या पुरस्कारासाठी मला ग्राह्य धरलेले नाही. पण मी माझ्या खेळावरच लक्ष देत राहीन. मला अपेक्षा होती की मला यावर्षी खेलरत्न मिलेळ. पण, मला असं वाटते की हा त्यांचा अंतिम निर्णय नसावा. पण जे काही होईल, ते मी सकारात्मक पद्धतीने स्वीकारेन,” अशी मनातील खदखद एका कार्यक्रमात तिने बोलून दाखवली.

- Advertisement -

मनू भाकरचे वडील रामकिशन भाकर म्हणाले की, “तुम्ही खेळाडूंना असे प्रोत्साहन देत आहात का? आम्ही पुरस्कारासाठी अर्ज केला, पण समितीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पालक आपल्या मुलांना खेळण्यासाठी का प्रोत्साहन देत आहेत?” असे म्हणत आपला राग व्यक्त केला. दरम्यान, मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दोन पदके जिंकली आहेत. तिने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. सरबज्योत सिंगसोबत त्याने 10 मीटर मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदकही पटकावले होते. तसेच, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली खेळाडू ठरली.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -