घरदेश-विदेशकोरोना संकटादरम्यान यूपी-बिहार सीमेवर गंगा नदीत आढळले डझनभर मृतदेह; परिसरात खळबळ

कोरोना संकटादरम्यान यूपी-बिहार सीमेवर गंगा नदीत आढळले डझनभर मृतदेह; परिसरात खळबळ

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे तर मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण ही तितकेच आहे. कोरोना महामारी दरम्यान, नदी असणाऱ्या अनेक ठिकाणी मृतदेह आढळून येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. बक्सरनंतर यूपी-बिहार सीमेवरील गहमर गावाजवळील गंगा नदीत डझनभर मृतदेह सापडले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने मृतदेह सापडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरातील लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून लोकांना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भिती आहे. हे मृतदेह आढळून आल्यानंतर गावातील लोकांनी जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली. यासोबतच योग्य ठिकाणी त्यांची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्यात यावी, यासाठी विनंती केली आहे.

ही घटना पूर्व उत्तर प्रदेशातील गाझीपूरच्या गहमर पोलिस स्टेशन भागातील आहे. जिथे बिहारच्या दिशेने वाहणाऱ्या गंगेच्या काठी डझनभर मृतदेह सापडले आहेत. ज्यामुळे या भागात दुर्गंधी व इतर प्रकारच्या संसर्गजन्य रोगांचा धोका पसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझीपूरहून बिहारकडे वाहणारी गंगा नदी गहमर पोलिस स्टेशन परिसरातील गहमर गावातून वाहते. यानंतर बिहारचा चौसा परिसर सुरू होतो. स्थानिक लोकांच्या मते, आजकाल कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या बरीच वाढली आहे. हिंदू धर्मानुसार, दोन प्रकारे मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले जाते. एक म्हणजे अग्नी देऊन आणि दुसरं म्हणजे हे मृतदेह वाहत्या पाण्यात सोडून. त्यामुळे कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने लोकं मृतदेह पाण्यात सोडत आहेत.

- Advertisement -

या संपूर्ण प्रकरणात जिल्हा दंडाधिकारी मंगला प्रसाद सिंह यांनी गंगा येथे मृतदेह आढळल्याची माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, ही बाब त्यांच्या गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. ते म्हणाले की, या प्रकरणाची माहिती मिळताच चौकशी पथकही घटनास्थळावर पाठविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी बिहारच्या बक्सर जिल्ह्यात गंगा नदीत कमीतकमी ३० मृतदेह सापडले होते. सापडलेल्या मृतदेह वाहून गेल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. असे म्हटले आहे की हे मृतदेह बिहारमधून नव्हे तर उत्तर प्रदेशातून आले आहेत, सध्या या प्रकरणाचा देखील तपास सुरू आहे.

दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी लाकडं नसल्यामुळे किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जाणाऱ्या गरीब लोकांनी बक्सरमधील गंगा येथे मृतदेहाचे विसर्जन केले, हे सत्य नसल्याचे बक्सरचे जिल्हाधिकारी अमन समीर यांनी सांगितले. तसेच गंगा नदीत तरंगताना मृतदेह आढळले असून त्यांच्यावर योग्यरित्या अंत्यसंस्कार करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -