Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश 2023 मध्ये देखील अनेकांवर मृत्यूचं सावट? काय आहे बाबा वेंगाची यंदाची भविष्यवाणी

2023 मध्ये देखील अनेकांवर मृत्यूचं सावट? काय आहे बाबा वेंगाची यंदाची भविष्यवाणी

Subscribe

2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलण्याची स्पष्ट शक्यता आहे, ज्यामुळे हवामान बदल होईल. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढेल आणि मानवासाठी गंभीर समस्या निर्माण होतील.

आपला भविष्यकाळ कसा असेल याची उत्सुकता अनेकांमध्ये असते. मागील काही वर्षांपासून जगभरामध्ये भविष्य ऐकण्याकडे आणि वाचण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. यामध्ये काही भविष्यवाण्या सुप्रसिद्ध भविष्यवक्ता ‘बाबा वेंगा’ यांनी केल्या आहेत. त्यांनी जगावर येणाऱ्या संकटांबद्दल आधी वक्तव्य करून ठेवली आहेत. 2023 साठी देखील बाबा वेंगा यांनी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या.

बाबा वेंगा यांच्या मते, 2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलण्याची स्पष्ट शक्यता आहे, ज्यामुळे हवामान बदल होईल. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढेल आणि मानवासाठी गंभीर समस्या निर्माण होतील. 2023 वर्षासाठी केलेल्या आणखी एका भयानक भविष्यवाणीनुसार, प्रमुख देश घातक जैविक शस्त्रे वापरतील, ज्यामुळे हजारो लोक मारले जातील.

2023 मध्ये होणार तिसरे महायुद्ध

- Advertisement -

रशिया-युक्रेनचे हे युद्ध मागील अनेक महिन्यांपासून सुरु आहे. या दरम्यान जगभरातील अनेक नेत्यांनी तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली. या युद्धात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी देखील परमाणु हल्ले केले आहेत. या सर्व घटना बाबा वेंगाद्वारे करण्यात आलेल्या भविष्यवाणीची आठवण करुन देतात. बाबा वेंगाने 2023 मध्ये तिसरे महायुद्ध होण्याची भविष्यवाणी सांगितली होती. इतकंच नव्हे तर प्रसिद्ध भविष्यवेत्ता नास्त्रेदमसने देखील तिसरे महायुद्ध होण्याची भविष्यवाणी केली होती.

संपूर्ण जगाला भोगावा लागणार तिसऱ्या महायुद्धाचा परिणाम

जर तिसरे महायुद्ध झाले तर जगभरातील लोकांचे खूप नुकसान होईल. या युद्धामुळे निसर्गाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.

कोण होत्या बाबा वेंगा?

- Advertisement -

Baba Vanga Ki Bhavishyavani: Baba Vanga 2022 Predictions Famine In India Due To Locust Attack New Lethal Virus Alien Attack - बाबा वेंगा की भविष्‍यवाणी, साल 2022 में भारत में आएगी भीषण

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा वेंगा एक फकीर होती. जी बुल्गारियामध्ये राहणारी होती. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला, वयाच्या 12 व्या वर्षी ते दृष्टीहीन झाले. असं म्हणतात की, त्यांनी केलेल्या 85 टक्के भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. तर काही दावे खोटे देखील ठरले आहेत. शिवाय त्यांनी सांगितलेल्या भविष्यवाण्या कुठेही लिहिलेल्या नाहीत. बाबा वेंगांनी या भविष्यवाण्या त्यांच्या अनुयायींना सांगितल्या होत्या आणि त्यांनी या लिहिल्या. 1996 मध्ये बाबा वेंगा यांचा मृत्यू झाला. मात्र, मरणापूर्वी त्यांनी वर्ष 5079 पर्यंतच्या भविष्यवाण्या केल्या आहेत. कारण बाबा वेंगांच्या मते 5079 जग नष्ट होणार आहे.


हेही वाचा : परदेशातील या 600 वर्ष जुन्या रहस्यमय मंदिराचे विषारी साप करतो रक्षण

- Advertisment -