घरताज्या घडामोडीमराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी संपली, पुढील सुनावणी २७ जुलैला!

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी संपली, पुढील सुनावणी २७ जुलैला!

Subscribe

मराठा आरक्षणासंदर्भात अंतरिम आदेशासाठी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. राज्यातल्या मराठा आरक्षणाची वैधता, त्याची व्याप्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ३० जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया संपणाऱ्या वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण असावं की नसावं या मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) ही सुनावणी घेण्यात आली. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं पुढील सुनावणीची तारीख दिली असून २७ जुलैला ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे ३० जुलैपूर्वी वैद्यकीय प्रवेशांसंदर्भातला निकाल येणं अपेक्षित असल्याने किमान २७ तारखेला तरी यासंदर्भातला अंतरिम निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) याआधीच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने १५ तारखेला सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. येत्या ३० जुलैपर्यंत राज्यातील वैद्यकीय प्रवेशाची मुदत आहे. मात्र, यामध्ये सध्या लागू असलेलं आरक्षण कायम ठेवावं की ते काढून टाकावं, यासंदर्भात या सुनावणीमधून निर्णय येणं अपेक्षित आहे. मात्र, ही मुदत ३० तारखेपर्यंतच असल्यामुळे त्याच्या आधीच हा निकाल येणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या खटल्याचा अंतरिम निकाल २७ जुलै रोजी येणं अपेक्षित आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुख्य निकाल देण्यासाठी न्यायालयाचं प्रत्यक्ष कामकाज होणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं याआधीच्या सुनावणीवेळी नमूद केलं होतं. जेव्हा प्रत्यक्ष कोर्ट भरतील, तेव्हाच या खटल्याचा निकाल देणं शक्य असल्याचं देखील न्यायालयानं म्हटलं होतं. त्यामुळेच वैद्यकीय प्रवेशांसाठी अंतरिम निकाल (Interim Order) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -