घरदेश-विदेशस्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये मराठी बेघर

स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये मराठी बेघर

Subscribe
एखादे स्मारक,वास्तू बांधल्यानंतर त्या वास्तूवर वास्तूच्या नावाची व वास्तूबाबत माहिती देणारी पाटी लावलेली पहायला मिळते. भारतात अनेकदा ही पाटी स्थानिक भाषेसह हिंदी आणि इंग्रजी भाषेत असते. ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली. परंतु पुतळ्याच्या खाली पुतळ्याचे नाव असलेली पाटी लावली आहे. या पाटीवर देश-विदेशातील भाषांचा समावेश आहे. परंतु ही पाटी लिहिताना प्रशासनाने मराठी भाषेला डावललं असल्याचे पहायला मिळत आहे.

शिवरायांचा उल्लेख पण मराठीचं वावडं

विशेष म्हणजे अनावरनाच्या वेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवरायांचा उल्लेख केला. सरदार पटेलांकडे शिवरायांसारखे शौर्य होते, असेदेखील ते म्हणाले. या पुतळ्याखाली जी नावाची पाटी आहे, त्यावर हिंदी, बंगाली, उर्दू, तमिळ गुजरातीसह रशियन, फ्रेंच आणि चीनी भाषेचा समावेश आहे. मात्र, शेजारच्या राज्यातील मराठी भाषेचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या पाटीमध्ये तमिळ आणि बंगाली भाषेतील नावात चुक झाली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -