घर देश-विदेश अमेरिकेतील प्रतिष्ठीत 'हील कॉन्फ्रेन्स 2023' पुरस्कारावर मराठमोळ्या आकांक्षा पंडितने कोरले नाव

अमेरिकेतील प्रतिष्ठीत ‘हील कॉन्फ्रेन्स 2023’ पुरस्कारावर मराठमोळ्या आकांक्षा पंडितने कोरले नाव

Subscribe

मुंबई : मराठमोळ्या डॉ. आकांक्षा पंडित हिने तिच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अमेरिकेतील प्रतिष्ठीत ‘हील कॉन्फ्रेन्स 2023’ हा मानाचा पुरस्कार पटकविला आहे. डॉ. आकांक्षा पंडितने हा पुरस्कार मिळवित महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोविला आहे. आकांक्षा पंडित ही मेंदू-मज्जातंतूसंबंधित आजारांवर संशोधन करत आहेत. सध्या डॉ. आकांक्षा पंडित ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) निगडीत एका कंपनीमध्ये ‘कन्सल्टंट न्यूरोलॉजिकल फिजिकल थेरापिस्ट अँड अ-रिसर्च को-ऑर्डिनेटर’ म्हणून काम करते. नुकतेच अमेरिकेतील प्रतिष्ठत पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा ‘हील कॉन्फ्रेन्स 2023’ पुरस्काराने डॉ. आकांक्षा पंडितला गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण आणि एकमेव मराठी तरुणीचा मान पटकावला आहे, हे उल्लेखनीय.

आकांक्षा पंडिते शालेय शिक्षण हे मुलुंडमधील लोकमान्य टिळक विद्यालयातून झाले. यानंतर आकांक्षा पंडिते बारावीनंतरचे शिक्षण कामोठेमधील महात्मा गांधी महाविद्यालयातून फिजिओथेरेपीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. यानंतर न्यूरो फिजिओ रिहॅबिलिटेशन म्हणजे मेंदू विकाराने ग्रासलेल्या रुग्णांचे पुनर्वसन यामध्ये आकांक्षाने 2022पासून संशोधन करते. आकांक्षा ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय)चा वापर करून पार्किन्सन्स या गंभीर आजारावर स्मार्ट हातमोजाद्वारे उपाचार कसा करता येईल. यासंदर्भात आकांक्षा संशोधन आणि प्रयोग करत आहे. याद्वारे न्यूरोलॉजीमधील रुग्णांना जास्तीत जास्त चांगला उपचार मिळाण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनानंतर लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आजारांवर परिणाम झाल्याचे जगभरात दिसून आले असून उपचार घेतल्यानंतर घरी आल्यावर न्यूरोलॉजी रुग्णांची जास्त काळजी घ्यावी लागते, असे आकांक्षाने सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – US : गाडीला धडकून भारतीय वंशाच्या महिलेचा मृत्यू झाल्यावर पोलिसांकडून चेष्टा; चौकशी सुरू

उल्लेखनी कामगिरी करणाऱ्यांना मिळतो पुरस्कार

नुकतेच अमेरिकेत झालेल्या ‘हील कान्फ्रेन्स 2023’मध्ये डॉ. आकांक्षा पंडितला ‘हेल्थ केअर पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार हुशार डॉक्टरांना दिला जातो. डॉक्टरी पेक्षात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 50 पैकी 7 डॉक्टरांना हा पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

- Advertisement -

- Advertisment -